AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनुराग कश्यपच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस; नेमकं काय आहे प्रकरण?

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात करण्यात आलं आहे. ब्राह्मणांविषयी केलेल्या वादग्रस्त कमेंटनंतर अनुराग कश्यप अडचणीत सापडले आहेत.

अनुराग कश्यपच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस; नेमकं काय आहे प्रकरण?
Anurag KashyapImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 20, 2025 | 10:46 AM
Share

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ब्राह्मण समुदायाविषयी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर चाणक्य सेनेनं शनिवारी त्यांच्याविरोधात एक घोषणा केली. कश्यप यांच्या चेहऱ्याला काळं फासणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा चाणक्य सेनेनं केली. अनुराग यांच्या कमेंटविरोधात शनिवारी अनेक ब्राह्मण संघटनांनी ऑनलाइन बैठक घेतली. यात चाणक्य सेनेसोबतच सर्व ब्राह्मण महासभा, ब्राह्मण सेवा संघ, अखिल भारतीय ब्राह्मण महासभा, विश्व ब्राह्मण परिषद आणि अखिर भारतीय ब्राह्मण संघ यांचा समावेश होता. सर्व ब्राह्मण महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि चाणक्य सेनेचे मुख्य संरक्षक पंडित सुरेश मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

“अनुराग कश्यपसारख्या लोकांना धडा शिकवणं आवश्यक आहे, जे ब्राह्मणांबद्दल निराधार वक्तव्य करून समाजात फूट पाडत आहेत. ब्राह्मण समुदायाने या देशासाठी त्याग केले नाहीत का? सर्वांच्या कल्याणाबद्दल बोलणाऱ्या आणि देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या ब्राह्मणांवर अशा प्रकारच्या टिप्पण्या केल्या जात आहेत हे दुर्दैवी आहे. अशा परिस्थितीत त्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे”, अशा शब्दांत मिश्रा यांनी नाराजी बोलून दाखवली.

याविषयी मिश्रा पुढे म्हणाले, “समाजातील परस्पर आदर संपवण्याचे नापाक प्रयत्न करणाऱ्या समाजातील अशा विध्वंसक लोकांचा तीव्र विरोध झाला पाहिजे. सर्वजन हिताय आणि सर्वदजन सुखाय या भावनेनं काम करणाऱ्या ब्राह्ण समुदायाला लक्ष्य केल्याबद्दल अशा लोकांना अपमानित केलं पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.”

मिश्रा हे भाजप सदस्य असून ते संस्कृती युवा संस्थेचेही संचालक आहेत. त्यांच्या पुढाकाराने दरवर्षी जयपूर मॅरेथॉन आयोजित केली जाते. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी 2025 आणि 2024 मध्ये मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला होता. सलमान खान, अक्षय कुमार, रवीना टंडन, कंगना राणौत, मधुर भंडारकर, मंदिरा बेदी यांसारख्या सेलिब्रिटींनी मिश्रा यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावली होती. शनिवारच्या बैठकीत मिश्रा यांच्यासोबतच ब्राह्मण सेवा संघाचे विश्वंभर दयाल शर्मा, अखिल भारतीय ब्राह्मण महासंभाचे के. एन. तिवारी, विश्व ब्राह्मण परिषदेचे डॉ. के. व्ही. शर्मा, ऑल इंडिया ब्राह्मण संघाचे प्रवीण मिश्रासुद्धा उपस्थित होते.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू