Chandrayaan 3 | चांद के पार चलो… चांद्रयान 3 लाँचसाठी तय्यार, अक्षय कुमार, रितेशसह अनेक सेलिब्रिटींनी इस्रोला काय दिल्या शुभेच्छा ?
भारताची महत्वकांक्षी चांद्रयान 3 आज लाँच होणार आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन तळावरुन चांद्रयान 3 अवकाशाच्या दिशेने झेपावेल. या मोहिमेसाठी अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो आज चांद्रयान 3 (Chandrayaan 3) लाँच करणार आहे. भारतासाठी आज महत्वाचा दिवस असून अत्यंत महत्वकांक्षी चांद्रयान 3 मोहिमेला आज प्रारंभ होईल. आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी एलव्हीएम-एम4 रॉकेट चांद्रयान-3 ला घेऊन अवकाशात झेपावणार आहे. चार वर्षांपूर्वी शेवटच्या टप्प्यात चांद्रयान-2 मिशनला झटका बसला होता. 2019 मध्ये लँडर आणि रोव्हर चंद्रावर उतरवण्यात अपयश आलं होतं. आज भारत पुन्हा एकदा चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे.
या मोहिमेकडे देशभरातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले असून देशात उत्साहाचे वातावरण आहे. त्याचदरम्यान बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही (celebrity) यासंदर्भात ट्विट करत या मोहिमेला शुभेच्छा दिल्या आहेत.
Chandrayaan-3 mission: The ‘Launch Rehearsal’ simulating the entire launch preparation and process lasting 24 hours has been concluded.
Mission brochure: https://t.co/cCnH05sPcW pic.twitter.com/oqV1TYux8V
— ISRO (@isro) July 11, 2023
या सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा
अभिनेता रितेश देशमुख याने इस्रोसाठी संदेश शेअर केला आहे. रितेशने इस्रोची कॅप घातलेला स्वतःचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्याने एक संदेशही लिहीला आहे. ‘ चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणासाठी मी उत्साहित आहे. आपल्या देशाची शान असणाऱ्या इस्रोला या मोहिमेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला यश मिळावं हीच प्रार्थना ! जय हिंद. ‘ असे रितेशने ट्विटमध्ये नमूद केले आहे.
Excited for the launch of #Chandrayaan3 -wishing our nations pride @isro all the best – praying for its success. #JaiHind ?? pic.twitter.com/Jy4LtxCv83
— Riteish Deshmukh (@Riteishd) July 13, 2023
बॉलिवूडच्या खिलाडी अर्थात अक्षय कुमार यानेही चांद्रयान 3 मोहिमेसाठी इस्रोला शुभेच्छा दिल्या आहे. अक्षयने 2019 केलेले एक ट्विट पुन्हा शेअर केले आहे. ‘ पुन्हा पुढे जाण्याची वेळ आली आहे. इस्रोच्या वैज्ञानिकांना चांद्रयान 3 मोहिमेसाठी खूप शुभेच्छा. कोट्यावधी लोकं एकत्र तुमच्यासाठी प्रार्थना करत आहेत ‘, असे त्याने म्हटले आहे.
And the time has come to rise! Great luck to all our scientists at @isro for #Chandrayaan3. A billion hearts are praying for you. ? https://t.co/Lbcp1ayRwQ
— Akshay Kumar (@akshaykumar) July 14, 2023
तर अभिनेता अनुपम खेर यांनीही चांद्रयान 3 लाँच होण्याच्या आनंदात ट्विट शेअर केले आहे. ‘ भारत चंद्रावरील तिसर्या मोहिमेसाठी पूर्णपणे तयार आहे. चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांना खूप शुभेच्छा. झंडा उँचा रहे हमारा. जय हिंद ! ‘ असे अनुपम खेर यांनी लिहीले आहे.
India all set for its 3rd mission on the moon. Wishing our scientists at #ISRO all the very best for the launch of #Chandrayaan3 . झंडा ऊँचा रहे हमारा. जय हिन्द! ?? @isro #Chandrayaan3 #IndiaontheMoon #ProudIndian #WorldwatchingIndia #SurgingIndia pic.twitter.com/AHSi8wZj2T
— Anupam Kher (@AnupamPKher) July 14, 2023
40 दिवसात पूर्ण होणार प्रवास
इस्रोचं चांद्रयान-3 चंद्रावर जाण्यासाठी सज्ज झालं आहे. आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी इस्रोच चांद्रयान-3 चंद्राच्या दिशेने प्रस्थान करेल. भारताच्या चांद्रयान 3 ला चंद्रावर पोहोचण्यासाठी महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. 23 किंवा 24 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगच इस्रोच लक्ष्य आहे. चांद्रयान-2 मोहिमेत जी उद्दिष्टं होती, तेच चांद्रयान-3 मिशनचं लक्ष्य असणार आहे. कारण त्यावेळी चांद्रयान-2 मोहिम शेवटच्या टप्प्यात फसली होती. आपल्याला चंद्रावर योग्य पद्धतीने लँडर उतरवता आला नव्हता.
