AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माफ कर मी तुला… बायकोची माफी, आशीर्वाद अन् ब्लास्ट… धुरंधरमधल्या खऱ्याखुऱ्या चौधरी असलमचा कसा झाला मृत्यू?

'धुरंधर 2' मधील चौधरी असलम यांच्या मृत्यूची खरी कहाणी त्यांची पत्नी नूरीन असलम यांनी उघड केली आहे. सिनेमातील व्यक्तिरेखेवर आक्षेप घेत, ल्यारी ऑपरेशन आणि कुटुंबावरील बॉम्बस्फोटाचे थरारक प्रसंग त्यांनी सांगितले. बुलेटप्रूफ जॅकेट न घालण्याचे असलम यांचे धाडस आणि त्यांच्या अखेरच्या क्षणांतील भावनिक संवाद नूरीन यांनी सांगितला.

माफ कर मी तुला... बायकोची माफी, आशीर्वाद अन् ब्लास्ट... धुरंधरमधल्या खऱ्याखुऱ्या चौधरी असलमचा कसा झाला मृत्यू?
एसपी चौधरी अस्लम
| Updated on: Apr 01, 2026 | 2:14 PM
Share

सध्या भारताताच नव्हे तर पाकिस्तानातही धुरंधर 2 ने धुमाकूळ घातला आहे. पाकिस्तानातील गँगवारवर हा सिनेमा आधारीत असल्याने या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमातील सर्वांनीच आपल्या भूमिका चोख आणि अप्रतिम साकारल्या आहेत. यातील पाकिस्तानी पोलीस अधिकारी चौधरीची व्यक्तिरेखा अभिनेता संजय दत्तने साकारली आहे. संजय दत्तच्या कामाची सर्वत्र तारीफही झाली आहे. पण चौधरी असलमची बायको नूरीन यांना मात्र, तिच्या नवऱ्याची व्यक्तीरेखा चुकीच्या पद्धतीने रंगवल्याचं वाटत आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी तसं बोलून दाखवलं. एवढेच नव्हे तर ल्यारी ऑपरेशन आणि चौधरी असलम यांच्या मृत्यूवरही नूरीन यांनी भाष्य केलं आहे.

चौधरी असलम यांनी ल्यारीत छापा मारला होता. त्यावेळी रॉकेट लॉन्चर उडवण्यात आले होते. चोहोबाजूंनी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. एअरक्राफ्ट उडवण्यात आले होते. ल्यारी गँगच्या काळात महिलांना पुढे केलं जायचं. पाकिस्तानी कायद्यानुसार तुम्ही महिलांवर गोळी झाडू शकत नाही. चौधरी सर्व गोष्टी घरात करत नव्हते. ज्यावेळी चौधरी ल्यारीला आले तेव्हा चॅनलवर लाइव्ह दाखवण्यात आलं होतं. ते पाहून मी त्यांना फोन केला. तेव्हा तू त्रस्त होऊ नकोस असं ते म्हणाले. मी तिकडे गोळीबार केला नाही. सर्व सिस्टिम जॅम झाल्या आहेत, असं ते म्हणाले. तुम्ही कसे आहात? असं मी त्यांनी म्हटलं. तेव्हा जो दिवस लिहिला गेलाय त्या दिवशी कोणीच वाचू शकणार नाही, असं ते म्हणाले होते, असं नूरीन यांनी सांगितलं.

बुलेटप्रुफपासून दूर

ल्यारी ऑपरेशनच्यावेळी चौधरींनी बुलेटप्रुफ जॅकेट घातलं नव्हतं. त्यांनी आपल्या आयुष्यात कधीच बुलेटप्रुफ जॅकेट घातलं नव्हतं. सिनेमात संजय दत्तनेही बुलेटप्रुफ जॅकेट घातलेलं नाहीये. मी चौधरींना अनेकदा बुलेटप्रुफ जॅकेट घालायला सांगितलं होतं. पण ते ऐकत नसत. एवढ्या मोठ्या घटना घडत आहेत. त्यामुळे तुम्ही जॅकेट घालत जा. इकडे कुटुंबाला तुमची चिंता असते, असं मी त्यांना सांगायचंही नूरीन म्हणाल्या.

आमच्या घरात बॉम्बस्फोट झाला

डिफेन्स परिसरातील आमच्या घरात जेव्हा बॉम्बस्फोट झाला तेव्हा तुम्ही सेफ गाडीतून जात जा म्हणून मी चौधरींवर दबाव टाकायला सुरुवात केली. पण चौधरी गाडीने जायचे आणि काही अंतर गेल्यावर गाडीतून उतरायचे. सप्टेंबर 2011मध्ये आमच्या घरात ब्लास्ट झाला होता. चौधरी रात्री गस्तीवर होते. रात्रीचे दोन वाजले होते. तुम्ही घरी कधी येणार हे विचारण्यासाठी मी फोन केला. म्हणाले, मला उशीर होईल. बॉम्बस्फोट होण्याचं इनपुट मिळालं आहे. सकाळी ब्लास्ट होणार आहे. सौदीच्या दुतावासात किंवा अमेरिकेच्या दुतावासात स्फोट होणार आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. नंतर कळलं की जिथे ब्लास्ट होणार होता ते आमचंच घर होतं. सकाळी 5 वाजता चौधरी घरी आले. मी जेवणाचं विचारलं तर जेवले नाही. त्यादिवशी मी गेटवर सर्व वाहने लावली. मी म्हणाले, आज मेन गेट नाही, साईड गेटचा वापर करू. तुम्ही गेट नंबर दोनमधून याल हे मी चौधरींना सांगितलं. सकाळी 7 वाजता मी घराच्या बाहेर पडले आणि जोरदार धमाका झाला. चौधरी गाढ झोपेत होते. घराच्या खिडक्यांचे तावदान तुटले. सर्व काचा त्यांच्या अंगावर कोसळल्या. घरातील सर्व वस्तू खाली कोसळल्या.

दोन खोल्या वाचल्या. त्यात आम्ही होतो म्हणून आम्ही सर्व वाचलो. 350 किलो स्फोटकांनी भरलेला बॉम्ब होता. ब्लास्टचा आवाज खूप दूरपर्यंत गेला. धमका एवढा जोरदार होता की जमिनीतून पाणी यायला लागलं. या स्फोटात 8 लोक ठार झाले. या स्फोटाची जबाबदारी तहरीके तालिबान पाकिस्तानने घेतली. त्याच्या कमांडरला चौधरींनी प्रचंड शिव्या घातल्या. चौधरीने म्हटलं होतं की, मी बंदूकीच्या गोळयांनी मरणार नाही. जेव्हाही मरेल तेव्हा बॉम्बब्लास्टमध्येच मरेल. चौधरींवर एकूण 11 जीवघेणे हल्ले झाले होते, असंही त्यांनी सांगितलं.

कसा झाला मृत्यू?

2014मध्ये चौधरीची हत्या झाली होती. त्या दिवशी एका हॉस्पिटलमधून मी दुपारी 3 वाजता ड्रायव्हरसोबत घरी आले. रस्त्यातच मला माझ्या बहिणीचा फोन आला. चौधरी कुठे आहेत म्हणून विचारत होती. कारण मी चौधरींना घरी सोडून आले होते. मला वाटलं चौधरी झोपेतून उठण्याच्या आधीच मी घरी पोहोचेल. चौधरी तयार होऊन कुठे तरी जात आहे, असं बहिणीने सांगितलं. मी एका आठवड्यापासून नाराज होते. दुबईतून आले होते. तुम्ही दुबईतून पटकन या. चौधरींच्या जीवाला धोका आहे, असं मला गनमॅनने चोरून सांगितलं होतं. मला तिथे तीन दिवसापेक्षा अधिक दिवस थांबण्याची परवानगी नव्हती. मी म्हटलं तुमच्याकडे बुलेटप्रुफ गाडी नाहीये. मी तुम्हाला जाऊ देणार नाही. त्यावेळी चौधरी म्हणाले. फक्त पाच दिवस थांब. गाडी येईल. मला काहीच होणार नाही, असं सांगत त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला. मला माफ कर. मी तुला कधीच वेळ देऊ शकलो नाही, असं ते म्हणाले. त्यावर मला तुमच्याबद्दलची कोणताही तक्रार नाही, असं मी त्यांना सांगितलं.

त्यानंतर चौधरी घरातून बाहेर पडले. छतावरूनच मी त्यांना बाय केलं. घरातून निघून त्यांना 10 ते 12 मिनिटे झाले असतील. त्याचा मला टोलनाक्यावरून फोन आला. म्हणाले, नूरीन आपण आज कुठेतरी बाहेर भेटलं पाहिजे, असं मन म्हणतंय, असं ते म्हणाले. त्यावेळी आमचं आयुष्य संकटातच होतं. आमचे अनेक घर होते. त्यावेळी मी त्यांना म्हटलं आज प्रकृती ठिक नाही. आपण उद्या जाऊ. त्यावर ते म्हणाले, खूश राहा. तुझ्या चौधरीचा खुदा हाफिज. तेवढ्यात बॉम्बब्लास्ट झाला. नंतर ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या. चौधरी जखमी असल्याचं सांगितलं जात होतं. पण चौधरी आता जगात नाहीत, असं माझ्या मनात आलं. 125 स्फोटकांनी भरलेली कार चौधरींच्या कारला जाऊन धडकली होती. हा आत्मघातकी हल्ला होता. सर्व नेत्यांचे फोन आले होते. परवेज मुशर्रफ यांनी सर्वात आधी फोन केला होता. दु:ख व्यक्त केलं होतं. नवाज शरीफ यांचा फोन आला होता. पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी फोन केला होता. सर्वांनी दु:ख व्यक्त केलं. टीटीपीने हल्ल्याची जबाबदारी घेतली होती, असंही त्या म्हणाल्या.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?