AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chehre Vs The Big Bull : पहिल्यांदाच बाप-लेक आमने-सामने, कोण मारणार बाजी अमिताभ बच्चन की अभिषेक?

इतिहासात प्रथमच वडील आणि मुलाच्या चित्रपटात टक्कर होणार आहे. (Chehre Vs The Big Bull: For the first time, Father-Son will face each other, who will win, Amitabh Bachchan or Abhishek?)

Chehre Vs The Big Bull : पहिल्यांदाच बाप-लेक आमने-सामने, कोण मारणार बाजी अमिताभ बच्चन की अभिषेक?
| Edited By: | Updated on: Mar 21, 2021 | 7:05 AM
Share

मुंबई : सन 2021 मध्ये अनेक चित्रपट चित्रपटगृह आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. यावर्षात अनेक चित्रपटांमध्ये स्पर्धा होणार आहे. इतिहासात प्रथमच वडील आणि मुलाच्या चित्रपटात टक्कर होणार आहे.  अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे ‘द बिग बुल’ आणि ‘चेहेरे’ चित्रपट होणार आहेत. बिग बुल ओटीटी प्लॅटफॉर्म 8 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे आणि 9 एप्रिल रोजी थिएटरमध्ये धडकणार आहे.

बिग बी आणि अभिषेकनं बर्‍याच सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे मात्र बॉक्स ऑफिसवर दोघं एकत्र धडकण्याचं पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे. तेही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आहेत. दोघांनी बंटी औंर बबली, सरकार आणि पा यासारख्या बर्‍याच चित्रपटात काम केलं आहे.

कोण मारणार बाजी

अभिषेक बच्चन यावेळी बाजी मारण्याची शक्यता आहे कारण यावेळी देशात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहेत, अशा परिस्थितीत लोक सिनेमागृहांकडे जाण्याऐवजी घरीच राहून चित्रपट पाहणं पसंत करणार आहेत. अशा परिस्थितीत अभिषेक बच्चन यांच्या ‘बिग बुल’ या चित्रपटाचा फायदा होऊ शकतो. कोरोनाचं वाढतं प्रमाण बघता राज्यात पूर्ण क्षमतेनं थिएटर उघडण्याचा निर्णय घेणं शक्य दिसत नाही त्यामुळे चेहरे या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईवर परिणाम होऊ शकतो. ही आहे

‘द बिग बुल’ची कथा

द बिग बुलमध्ये अभिषेक बच्चनसोबत इलियाना डिक्रूझ आणि निकिता दत्ता मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 1992 मधील भारतीय शेअर बाजाराच्या सर्वात मोठ्या घोटाळ्यातील आरोपी हर्षद मेहतावर द बिग बुल हा चित्रपट आधारित आहे. हर्षद मेहता हे शेअर बाजारातील एक मोठे नाव आहे. हर्षदन अनेक आर्थिक गुन्हे केले आहेत, त्यामुळे त्याला अटक करण्यात आलीये. हा चित्रपटाची निर्मिती अजय देवगन आणि आनंद पंडित करत आहेत.

चेहरे या चित्रपटाची कथा

चेहरे हा एक गूढ-थ्रिलर चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन रूमी जाफरी यांनी केलं आहे. या वर्षाचा सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपट म्हणून चेहरे मानला जातोय. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी व्यतिरिक्त रिया चक्रवर्ती, अन्नू कपूर, क्रिस्टल डिसूझा, धृतिमान चक्रवर्ती, रघुबीर यादव आणि सिद्धांत कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड केली आहे.

संबंधित बातम्या

Photo : ‘कपल गोल्स’, नेहा कक्कर आणि रोहनप्रीतचे रोमँटिक फोटो

Photo : ‘मालदीव इज ऑन’, हीना खानचं व्हेकेशन मोड

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.