Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘छावा’चा सेट पाडला, दीड महिना ब्रेक घेतला..; छत्रपती संभाजी महाराजांच्या छळाच्या सीनबद्दल दिग्दर्शकांचा खुलासा

'छावा' या चित्रपटातील छळाचा सीन कसा शूट झाला, याविषयी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला. रात्रभर विकीचे हात दोरखंडाने बांधले होते, असं त्यांनी सांगितलं. या सीननंतर दीड महिना ब्रेक घेण्यात आला आणि सेटही पाडण्यात आला होता.

'छावा'चा सेट पाडला, दीड महिना ब्रेक घेतला..; छत्रपती संभाजी महाराजांच्या छळाच्या सीनबद्दल दिग्दर्शकांचा खुलासा
Vicky KaushalImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 06, 2025 | 10:54 AM

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. याच्या टीझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांची तर अभिनेक्षी रश्मिका मंदाना ही महाराणा येसुबाई यांची भूमिका साकारतेय. औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना आहे. या चित्रपटासाठी विकी कौशलने प्रचंड मेहनत घेतल्याचं दिग्दर्शकांनी विविध मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी शूटिंगदरम्यान एक प्रसंग सांगितला. या प्रसंगानंतर जवळपास दीड महिना चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं होतं आणि संपूर्ण सेट पूर्णपणे पाडण्यात आला होता.

उतेकरांनी या मुलाखतीत शूटिंगदरम्यान तो प्रसंग सांगितला, तेव्हा शूटिंगदरम्यान विकीचे हात संपूर्ण रात्रभर बांधून ठेवण्यात आले होते. तरीसुद्धा त्याने कोणतीच तक्रार केली नव्हती. ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “टॉर्चर सीनच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी आम्हाला समजलं की हा तोच दिवस होता, जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करण्यात आला होता. योगायोगाने आम्ही त्याच दिवशी त्या सीनचं शूटिंग करत होतो.”

हे सुद्धा वाचा

विकीला झालेली दुखापत आणि त्याचा चित्रपट निर्मितीवर कसा परिणाम झाला, याविषयी त्यांनी पुढे सांगितलं, “संपूर्ण रात्रभर विकीचे हात बांधले होते. जेव्हा आम्ही दोरीला बांधलेले त्याचे हात सोडवले, तेव्हा तो त्याचे हात खाली वाकवूच शकत नव्हता. इतके तास दोरखंडाने हात वर बांधल्याने ते आखडले होते. त्यासाठी आम्हाला दीड महिन्यांचा ब्रेक घ्यावा लागला होता. या काळात आम्ही तो सेट पूर्णपणे पाडला. विकीला बरं होण्यासाठी आम्ही तो वेळ दिला. त्यानंतर पुन्हा सेट बांधण्यात आला आणि पुन्हा आम्ही शूटिंग केली.”

या चित्रपटात अभिनेता अक्षय खन्ना हा मुघल शासक औरंगजेबच्या भूमिकेत आहे. टीझर आणि ट्रेलरमधील अक्षय खन्नाच्या भूमिकेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यापूर्वी कधीच न दिसलेल्या अंदाजात अक्षय प्रेक्षकांसमोर येणार आहे. विकी कौशल आणि अक्षय खन्ना या दोघांमधील संघर्षाचा मोठा सीन शूट करण्यापूर्वी त्यांनी एकमेकांसमोर येणं टाळलं होतं. याविषयी उतेकर यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता. ‘छावा’ हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, अंगावर काटा येणारा व्हिडीओ पाहिला?
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, अंगावर काटा येणारा व्हिडीओ पाहिला?.
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी.
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?.
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने.
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन.
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.