AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर मला अटक झाली असती..; मुलाच्या नावावरून ट्रोल करणाऱ्यांना चिन्मय मांडलेकरच्या पत्नीचं सडेतोड उत्तर

अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि त्याची पत्नी नेहा यांना मुलाच्या नावावरून प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं होतं. या ट्रोलिंगवर नेहाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनमोकळी प्रतिक्रिया दिली आहे.

तर मला अटक झाली असती..; मुलाच्या नावावरून ट्रोल करणाऱ्यांना चिन्मय मांडलेकरच्या पत्नीचं सडेतोड उत्तर
Chinmay and Neha MandlekarImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 17, 2026 | 10:49 AM
Share

अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि त्याची पत्नी नेहा यांना त्यांच्या मुलाच्या नावावरून प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज साकारतात पण खऱ्या आयुष्यात मात्र मुलाचं नाव जहांगीर ठेवलंय, असं म्हणत नेटकऱ्यांनी टीका केली होती. या टीकेवर आणि ट्रोलिंगवर आता चिन्मयची पत्नी नेहाने प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. मुलाचं नाव जहांगीर ठेवून मोठा गुन्हा केला असेल तर आतापर्यंत मला अटक झाली असती, असं तिने म्हटलंय.

‘अनुरुप विवाह संस्था’ला दिलेल्या मुलाखतीत नेहा जोशी म्हणाली, “ज्या आईने नऊ महिने पोटात मूल वाढवलं, त्या मुलाच्या जन्मासाठी यातना सोसल्या, मोठ्या दिव्यातून गेली. त्या मुलाचं नाव मी काय ठेवलं, हे मला कोणी विचारूच कसं शकतं? पब्लिक फिगर असल्याने चाहत्यांच्या कौतुकासोबतच त्यांच्या टीकेलाही सामोरं जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, हे मला कळतं. पण हे काही माझं काम नाही, ते माझं वैयक्तिक आयुष्य आहे. ट्रोलिंगच्या वेळी मला खरंच खूप त्रास झाला होता. मला माझ्या मुलाचं नाव दगडू ठेवायचं असेल तर मी ते ठेवणार. मला जे नाव आवडलं ते मी माझ्या मुलाचं ठेवलं. आता त्या नावाचा अर्थ जगज्जेता आहे तर मग तुम्ही विश्वजीत किंवा पृथ्वीराज का ठेवलं नाही, असं काही लोक म्हणतात. तर नाही.. माझी जशी इच्छा असेल तसं मी करेन.”

“माझ्या मुलाचं नाव जहांगीर ठेवून जर मी इतका मोठा गुन्हा केला असेल तर भारत सरकारने आतापर्यंत मला अटक केली असती. तसं काही झालेलं नाही. माझ्या संविधानाने दिलेला हक्क मी बजावत आहे. जे कोणी ट्रोल करत आहे, त्यातल्या एकाने तरी समोर यावं. त्यांना इतिहासाबद्दल बोलायचं आहे ना? ठीक आहे, आपण इतिहासाबद्दल बोलू. मग मी नाव कसं चुकीचं किंवा कसं बरोबर ठेवलं, तुमचं कसं बरोबर किंवा कसं चुकीचं ते आपण ठरवू. खरं सांगायचं झालं तर मला आता त्याने काहीच फरक पडत नाही”, अशी रोखठोक प्रतिक्रिया नेहाने दिली.

मुलाच्या नावावरून होणाऱ्या ट्रोलिंगचा विचार करून चिन्मयने भविष्यात पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नसल्याचं जाहीर केलं होतं. “जर पडद्यावर मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारल्याने माझ्या कुटुंबीयांना, मुलाला ट्रोलिंगला सामोरं जावं लागत असेल तर मी यापुढे ही भूमिका साकारणार नाही,” असं त्याने म्हटलं होतं.

Follow Us
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?