AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाच घरात चार मृतदेह! अख्खं कुटुंबच संपलं… आत्महत्या की घातपात? वाशिम जिल्ह्यातील मालेगाव हादरलं

घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. चारही मृतदेहांचे शवविच्छेदन आणले असून पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

एकाच घरात चार मृतदेह! अख्खं कुटुंबच संपलं... आत्महत्या की घातपात? वाशिम जिल्ह्यातील मालेगाव हादरलं
वाशिमImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 14, 2026 | 3:28 PM
Share

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तिवळी गावात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. सर्वात पहिले वडिलांनी पत्नी आणि दोन्ही मुलांना विहिरीत ठरलले. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. पण महिलेच्या भावाने हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

नेमकं काय घडलं?

संतोष तुकाराम बकाल (वय ३५) यांनी आपल्या पत्नीसह मुलगी जानव्ही बकाल वय वर्षे ७ वर्षे व मुलगा सोहम बकाल वय ५ वर्षे दोन चिमुकल्याना विहिरीत टाकून त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. मात्र ही आत्महत्या की घात पात याचा तपास शिरपूर पोलीस करत आहेत. या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी मृत महिलेच्या भावाने मात्र घातपात केल्या असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे तिवळी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

भावाने केली पोलिसात तक्रार

मृत इंद्रायणी बकाल यांचे भाऊ सुधाकर इंगोले यांनी या प्रकरणात घातपाताचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, संतोष बकाल यांना त्यांच्या सख्ख्या भावाकडून वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. या धमक्यांचे ध्वनिमुद्रण अर्थात रेकॉर्डिंग आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, या संदर्भात यापूर्वी अनेक वेळा पोलिस ठाण्यात तक्रारी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. कुटुंबीयांमध्ये सुरू असलेल्या वादातून हा प्रकार घडला असावा असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. चारही मृतदेहांचे शवविच्छेदन आणले असून पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. आत्महत्या की घातपात याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसून शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतरच सत्य स्पष्ट होणार असल्याचे पोलीस निरीक्षक केशव वाघ यांनी सांगितले आहे. या घटनेमुळे तिवळी गावासह संपूर्ण मालेगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले