AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चिरैया’मधील वेडिंग नाइटचा सीन, थरथर कापत अभिनेत्याला कोसळलं रडू; कसा झाला चित्रीत?

'चिरैया' या वेब सीरिजमधील वेडिंग नाइटच्या सीनविषयी मुख्य अभिनेत्रीने खुलासा केला आहे. हा सीन शूट करण्यापूर्वी अभिनेत्याला रडू कोसळलं होतं, असं तिने म्हटलंय. ही वेब सीरिज सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

'चिरैया'मधील वेडिंग नाइटचा सीन, थरथर कापत अभिनेत्याला कोसळलं रडू; कसा झाला चित्रीत?
चिरैया सीरिजमधील दृश्यImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 05, 2026 | 1:34 PM
Share

ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या विविध चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये अनेक चौकटीबाहेरचे विषय हाताळले जातात. ज्याबद्दल फारसं बोललं जात नाही किंवा ज्याकडे एक गंभीर मुद्दा म्हणून पाहिला जात नाही, अशाच एका विषयावर जिओ हॉटस्टारवर ‘चिरैया’ नावाची सीरिज स्ट्रीम होत आहे. सीरिज सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून अनेकजण त्याला पसंती दर्शवत आहेत. या सीरिजमध्ये वैवाहिक बलात्कारासारखा (मॅरिटल रेप) गंभीर मुद्दा मांडण्यात आला आहे. अवघ्या सहा एपिसोड्सच्या या सीरिजने प्रेक्षकांमध्ये चर्चा घडवून आणली आहे. यामधील अरुण आणि पूजा यांच्यातील लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा सीन विशेष चर्चेत आहे. सिद्धार्थ शॉ आणि प्रसन्ना बिष्ट या कलाकारांवर हा सीन चित्रीत झाला आहे.

‘चिरैया’मध्ये अरुणची भूमिका सिद्धार्थ शॉने साकारली असून प्रसन्ना ही पूजाच्या भूमिकेत आहे. वेब सीरिजमधील अरुण आणि पूजा यांच्या ‘वेडिंग नाइट’चा सीन अंगावर काटा आणणारा आणि अनेकांसाठी भीतीदायक होता. हा सीन पाहून प्रेक्षकांना अरुणची प्रचंड चीड येत असली, त्याला मारावंसं वाटलं तरी प्रत्यक्षात मात्र तो सीन करताना सिद्धार्थ प्रचंड घाबरलेला होता. हा सीन करण्याआधी तो रडत होता, असा खुलासा प्रसन्नाने केला आहे.

‘फिल्मीज्ञान’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “या सीरिजमध्ये अरुणची भूमिका साकारणं सिद्धार्थसाठी अजिबात सोपं नव्हतं. सेटवर आमच्यासाठी इंटीमसी को-ऑर्टिनेटर उपस्थित होते. अशा प्रकारचे सीन कसे शूट करायचे आणि एकंदर काय करायचं, याबद्दल ते आम्हाला समजावून सांगत असतात. परंतु जेव्हा आम्ही वेडिंग नाइटचा तो सीन शूट करायला घेतला, तेव्हा सिद्धार्थ रडू लागला होता. तो अक्षरश: थरथर कापत होता. अखेर त्याला आम्ही सर्वांनी समजावलं आणि तो शांत होण्याची प्रतीक्षा केली.”

View this post on Instagram

A post shared by JioHotstar (@jiohotstar)

याविषयी सिद्धार्थ शॉने सांगितलं, “मला माहीत नाही, माझ्यासोबत असं का घडलं? मीसुद्धा एक माणूसच आहे आणि माणुसकीच्या विचारातूनच कदाचित असं झालं असावं. मी आणि प्रसन्ना एकमेकांना पाच वर्षांपासून ओळखतो. शूटिंगच्या आधी आम्ही रिहर्सलसुद्धा केलं होतं. आम्ही थेट हा सीन शूट केला नव्हता. तरीसुद्धा माझी पहिली प्रतिक्रिया म्हणजे थेट माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. कधी कधी आपल्याला समजत नाही की नेमकं काय होतंय, हेसुद्धा तसंच काहीसं होतं.”

‘चिरैया’ ही वेब सीरिज 20 मार्च 2026 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. जियो हॉटस्टारवर तुम्ही ही सीरिज पाहू शकता. एकूण सहा एपिसोड्सच्या या सीरिजमध्ये सिद्धार्थ आणि प्रसन्ना यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. प्रदर्शनाच्या 14 दिवसांनंतरही ही सीरिज ट्रेंडिंग लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Follow Us
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे.
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा.
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत 
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत .
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर......
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न....
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ.
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स.
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा.
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे..
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची....