AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

25 मिनट में खेल खत्म…, Operation Sindoor बद्दल कर्नल सोफिया कुरौशी यांचा खुलासा

Operation Sindoor बद्दल कर्नल सोफिया कुरैशी यांचा खुलासा, 'पाकिस्तानला उत्तर देणं गरजेचं होतं...', 'त्या' 25 मिनिटांमध्ये काय झालं? 'कौन बनेगा करोडपती 17' मध्ये तीन महिला अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा...

25 मिनट में खेल खत्म..., Operation Sindoor बद्दल कर्नल सोफिया कुरौशी यांचा खुलासा
फाईल फोटो
| Updated on: Aug 13, 2025 | 10:59 AM
Share

Operation Sindoor: ‘कौन बनेगा करोडपती 17’ शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एक खास एपिसोड प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये भारताच्या सशस्त्र दलातील तीन महिला अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ज्यामध्ये दोन अधिकारी अशा आहेत ज्यांनी पाकिस्तान विरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरसाठी ब्रीफींग केली. 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या एपिसोडमध्ये कर्नल सोफिया कुरैशी, व्योमिका सिंह आणि कमांडर प्रेरणा देवस्थळी ऑपरेशन सिंदूरबद्दल काही खास सांगणार आहेत.

15 ऑगस्ट रोजी प्रसारित होणाऱ्या एपिसोडचा एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये दोन महिला अधिकारी अमिताभ बच्चन यांना ऑपरेशन सिंदूरबद्दल सांगताना दिसत आहे. त्या म्हणाल्या, ‘पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर फार गरजेचं झालं होतं.’ एवढंच नाही तर, ऑपरेश सिंदूरचा पाकिस्तानवर काय परिणाम झाला याबद्दल देखील तीन महिला अधिकाऱ्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

कर्नल सोफिया कुरैशी याबद्दल बोलताना म्हणाल्या, ‘पाकिस्तान सतत कुरापती करत होता. त्यामुळे उत्तर देणं अत्यंत गरजेचं होतं. म्हणून ऑपरेश सिंदूर ही योजना करण्यात करण्यात आली. हा एक नवा भारत आहे, नव्या विचारांसोबत….’ त्यानंतर विंग कमांडर व्योमिका सिंह म्हणतात, ‘रात्री 1.05 पासून 1.30 पर्यंत… 25 मिनिटांत सर्व खेळ संपवला…’ पुढे कमांडर प्रेरणा दिवस्थळी ऑपरेश सिंदूरबद्दल म्हणाल्या, ‘टारगेट्सवर निशाणा साधला आणि नष्ट केलं. कोणत्याच नागरिकाला कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचलं नाही…’, या तीन महिला अधिकाऱ्यांनी जे सांगितलं ते ऐकून अमिताभ बच्चन आणि प्रेक्षक देखील देशभक्तीत रंगून गेले.

सांगायचं झालं तर, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने देखील मोठी कारवाई केली. फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी दहशतवाद्यांनी हिंदी आहे मुस्लिम, मुस्लिम आहेस तर, कलमा पठण करुन दाखव… असं सांगत अनेकांवर गोळीबार केला. यानंतर ऑपरेश सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं. यामध्ये पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.