पुरुषांची तुलना कुत्र्यांसोबत… माजी महिला खासदार वादाच्या भोवऱ्यात… म्हणाली, ‘बलात्कार आणि मर्डर करण्यापूर्वी पुरूष…’
'बलात्कार आणि मर्डर करण्यापूर्वी पुरूष...', पुरुषांची तुलना कुत्र्यांसोबत करणाऱ्या माजी महिला खासदार पोस्ट सर्वत्र व्हायरल, पोस्टनंतर सर्वत्र चर्चांना उधाण..., काय आहे संपूर्ण प्रकरण? घ्या जाणून

कन्नड सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी महिला खासदार राम्या कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील राम्या हिचं एक वक्तव्य सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राम्या हिने पुरुषांचा अपमान केला आहे… असं सांगण्यात येत आहे. सांगायचं झालं तर, राम्या हिने संबंधित पोस्ट भटक्या कुत्र्यांच्या समर्थनात केली होती. पण सोशल मीडियावर यामुळे वाद निर्माण झाला आहे.
प्रकरण तेव्हा समोर आलं जेव्हा राम्या हिने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. 7 जानेवारी 2026 रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन.व्ही. अंजारिया यांच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने भटक्या कुत्र्यांच्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली.
कोर्टाने काय सांगितलं?
भटक्या कुत्र्यांबद्दल आणि सार्वजनिक सुरक्षेबद्दल न्यायालयाने सांगितल्यानुसार, कोणता कुत्रा चावू शकतो आणि कोणता नाही हे आधीच सांगणं कठीण आहे. कोणता कुत्रा कोणत्या मूडमध्ये आहे हे कोणालाही माहिती नाही. रस्त्यावर, शाळांमध्ये, रुग्णालयांमध्ये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांची उपस्थिती धोकादायक आहे कारण ते चावण्याव्यतिरिक्त अपघातांना कारणीभूत ठरू शकतात.” अशात, न्यायालयाने शाळा, रुग्णालये, रेल्वे स्थानके इत्यादी कुत्र्यांपासून मुक्त करण्यावर भर दिला आणि कुत्र्यांना पकडून त्याच ठिकाणी परत सोडलं जाणार नाही, असं सांगून त्यांच्या पूर्वीच्या आदेशात सुधारणा केली.

कोर्टाच्या सुनावणीनंतर राम्या हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली. ‘पुरुषाच्या मानसिकतेला देखील वाचलं जावू शकत नाही. कोणता पुरुष कधी बलात्कार करेल आणि कधी मर्डर करेल याबद्दल काहीही सांगितलं जाऊ शकत नाही. याचा अर्थ सर्वच पुरुषांना तुरुंगात टाकलं पाहिजे?’
याचा अर्थ असा होतो की, एक दोन कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर सर्वच कुत्र्यांना दोषी ठरवणं योग्य नाही. असंच काही पुरुषांबद्दल देखील आहे. एक दोन नराधम असल्यामुळे सर्वच पुरुषांना दोषी ठरवणं योग्य नाही… असं अभिनेत्रीने सांगितलं. पण सर्व पुरुषांना तुरुंगात टाकायचं का? अभिनेत्रीचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्क्रीनशॉट शेअर होताच, अनेक नेटकऱ्यांनी पुरुषांची तुलना कुत्र्यांशी करून त्यांनी अपमानास्पद म्हटलं. तर काहींनी सर्व पुरुषांचा अपमान केल्याचा आरोप केला.
