Aryan Khan Bail | आर्यन खानचा मुक्काम तुरुंगातच, 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणी संपताना दिसत नाहीये. आज पुन्हा एकदा NDPS कोर्टाने आर्यन खानच्या न्यायलयीन कोठडीत वाढ केली आहे. त्याच्यासोबत इतर सात जणांची न्यायालयीन कोठती 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.त आली आहे.

Aryan Khan Bail | आर्यन खानचा मुक्काम तुरुंगातच, 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ
Aryan-Shah Rukh Khan

मुंबई : क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणात अडकलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या आडचणी संपता संपत नाहीयेत. आर्यन खानचा न्यायालयीन कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

न्यायालयीन कोठतीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणी संपताना दिसत नाहीये. आज पुन्हा एकदा NDPS कोर्टाने आर्यन खानच्या न्यायलयीन कोठडीत वाढ केली आहे. त्याच्यासोबत इतर सात जणांची न्यायालयीन कोठडी 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. न्यायालयाने हा निर्णय दिल्यानंतर आता शाहरुख खान तसेच त्याचे वकील कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र कोर्टाच्या या निर्णयामुळे आर्यन खानच्या पाठीमागे लागलेले शुक्लकाष्ठ संपताना दिसत नाहीये.

एनसीबीची टीम मन्नतवर धडकली, अनन्या पांडेला चौकशीसाठी बोलावलं

एकीकडे आर्यन खानची न्यायालयीन कोठडी 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर दुसरीकडे याच प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी एनसीबीची टीम शाहरुख खानचा बंगला म्हणजेच मन्नतवर धडकली होती. यावेळी एनसीबीने आर्यनची शैक्षणिक तसेच मेडिकल हिस्टरी मागवली आहे, असं सांगण्यात येत आहे. तसेच आर्यन खानच्या संपर्कात अभिनेत्री अनन्या पांडेदेखील होती असा संशय एनीसीबीला असल्यामुळे तिलादेखील एनसीबी कार्यालयात बोलावण्यात आले. तिची ड्रग्ज प्रकरणात चौकशी करण्यात आली.

आर्यन खानचा मुक्काम कोठडीत कसा वाढत गेला ?

2 ऑक्टोबर – आर्यन खानला अटक, एक दिवसाची कोठडी

क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान तसेच इतर सात आरोपींना अटक करण्यात आले. यामध्ये आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट तसेच मॉडेल मूनमून धमेचा यांचा समावेश होता. त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने त्यांना सुरुवातीला एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली होती.

4 ऑक्टोबर – तीन दिवसांची एनसीबी कोठडी

एक दिवसाची कोठडी संपल्यानंतर आर्यन खानला 4 ऑक्टोबर रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यानंतर आर्यन खान तसेच त्याच्या इतर साथीदारांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती. या कालावधीत एनसीबीने आर्यन खानची कसून चौकशी केली होती.

7 ऑक्टोबर – 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी

तीन दिवसांची एनसीबी कोठडीचा कालावधी संपल्यानंतर न्यायालयाने आर्यन खानसह इतर सात आरोपींना 7 ऑक्टोबर रोजी तब्बल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यावेळी कोर्टात आर्यन खान तसेच एनसीबीच्या वकिलांची खडाजंगी झाली होती. आर्यन खानच्या बाजूने अॅड मानेशिंदे यांनी बाजू मांडली होती. तर एनसीबीच्या बाजूने एएसजी अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला होता.

14 ऑक्टोबर – न्यायालयाने निकाल राखून ठेवला

14 ऑक्टोबर रोजी आर्यन खान, मूनमून धमेचा तसेच अरबाज मर्चंट यांना एनडीपीएस मुंबई कोर्टासमोर हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयात तिन्ही आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली. पण न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला.

20 ऑक्टोबर – आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला

एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी या प्रकरणावर सुनावणी घेतली. आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनुमन धामेचा या तिघांचाही जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्टाने फेटाळून लावला आहे.

(cruise ship drug case Special NDPS Court extends judicial custody of shah rukh khan son Aryan Khan and seven others till October 30)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI