AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dashavatar : बॉक्स ऑफिसवर ‘दशावतार’चा धुमाकूळ; 3 दिवसांत तगडी कमाई, थिएटरमध्ये गर्दी

Dashavatar : 'दशावतार' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत जबरदस्त कमाई केली आहे. दिलीप प्रभावळकर आणि महेश मांजरेकर या कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Dashavatar : बॉक्स ऑफिसवर 'दशावतार'चा धुमाकूळ; 3 दिवसांत तगडी कमाई, थिएटरमध्ये गर्दी
DashavatarImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 15, 2025 | 8:36 AM
Share

Dashavatar : दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौज असलेला ‘दशावतार’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करतोय. या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडला तगडी कमाई केली आहे. गेल्या काही महिन्यांत प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांच्या तुलनेत ‘दशावतार’ला प्रेक्षकांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत अपेक्षेपेक्षा चांगली कमाई केली आहे. शिवाय माऊथ पब्लिसिटी जोरदार सुरू असल्याने पुढील काही दिवसांत कमाईचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कोकणातील इरसाल माणसांचे नमुने, तिथल्या प्रथा परंपरा, दशावतारी नाट्यकला यांचा सुरेख मिलाफ असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवसांत तब्बल 3.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘दशावतार’च्या टीझर आणि ट्रेलरने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं होतं. ‘कोकणातला कांतारा’ अशी त्याची चर्चा झाली होती. त्यामुळे अगदी पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली. याचाच सकारात्मक परिणाम चित्रपटाच्या कमाईवर झाल्याचं पहायला मिळालं.

दशावतारची भारतातील कमाई-

पहिला दिवस- 50 लाख रुपये दुसरा दिवस- 1.25 लाख रुपये तिसरा दिवस- 2.00 लाख रुपये एकूण कमाई- 3.75 कोटी रुपये

‘तुझ्यात जीव रंगला’, ‘ भागो मोहन प्यारे’, ‘माझा होशील ना’, सध्याची लोकप्रिय मालिका ‘कमळी’ अशा अनेक यशस्वी मालिका देणारे आणि ‘संदूक ‘, ‘हापूस’सारख्या लोकप्रिय चित्रपटांचे लेखक सुबोध खानोलकर यांनी या चित्रपटाच्या कथा – पटकथा लेखनाबरोबरच दिग्दर्शनाची प्रथमच स्वतंत्रपणे धुरा सांभाळली आहे. तर गुरु ठाकूर यांनी संवाद आणि गीतलेखन केलं आहे. 12 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.

‘दशावतार’ हा चित्रपट केवळ एक सस्पेन्स थ्रिलर नसून, भावनांचा, रूढी परंपरांचा, पारंपरिक लोककलेचा आणि आधुनिक आव्हानांचा खेळ आहे. टीझर आणि ट्रेलरमधील कोकणातील भव्य निसर्ग दृश्ये, दशावतारी कलेशी संबंधित दृश्य आणि घनदाट अरण्य पाहून हा नेहमीपेक्षा वेगळा अनुभव देणारा चित्रपट असेल याची खात्री पटते आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील अनमोल ठेवा असलेल्या दशावतार परंपरेला मोठ्या पडद्यावर भव्यतेने मांडण्याचा प्रयत्न निर्माते-दिग्दर्शकांनी केला आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.