धूम 4 मध्ये व्हिलनच्या भूमिकेत दीपिका?

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone)  'धूम 4' (Dhoom 4) मध्ये दिसणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

धूम 4 मध्ये व्हिलनच्या भूमिकेत दीपिका?

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone)  ‘धूम 4’ (Dhoom 4) मध्ये दिसणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे काम देखील सुरू केले आहे. मात्र, आता या चित्रपटाविषयी एक बातमी पुढे आली आहे या चित्रपटात दीपिका पादुकोण व्हिलनच्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे. (Deepika Padukone will be seen in the movie ‘Dhoom 4’ in the role of a villain)

रिपोर्टनुसार चित्रपटांच्या निर्मात्यांनी दीपिका पादुकोणसोबत संपर्क साधला आहे आणि दीपिका देखील या चित्रपटामध्ये भूमिका करण्यासाठी उत्साहीत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दीपिका हा चित्रपट साइन करण्याअगोदर तिच्या तारखा सांभाळाव्या लागतील. सध्या दीपिकाचे वेळापत्रक व्यस्त आहे. दीपिका शाहरुख खानसोबत पठाण चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे.

रिपोर्टनुसार जॉन अब्राहम पठाण या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यापूर्वी शाहरुख आणि दीपिकाची जोडी ‘ओम शांती ओम’ चेन्नई एक्सप्रेस आणि हॅपी न्यू इयरमध्ये दिसली होती, ही जोडी चाहत्यांनी खूप आवडली होते. दीपिका पादुकोण सध्या शकुन बत्राच्या सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्या पुढच्या चित्रपटाची शूटिंग करत आहे. अलीकडेच दीपिकाने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने ओन्ली लव्ह लिहिले होते, दीपिकाच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होते.

संबंधित बातम्या : 

कोरोनाने मदतीचं महत्त्व शिकवलं म्हणत अर्जुन 100 कॅन्सरग्रस्तांना मदत करणार !

Video | फँड्रीतल्या ‘शालू’चा हा जलवा बघितलात का? पिरतीचा इंचू चावणारच !

अक्षय कुमारच्या चित्रपटाला नेटफ्लिक्सने नाकारलं, आता थिएटरच्या आडोशाला!

(Deepika Padukone will be seen in the movie ‘Dhoom 4’ in the role of a villain)

Published On - 6:20 pm, Fri, 12 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI