AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deool Band 2 : ‘देऊळ बंद 2’ची कमाई सुसाट; रितेश देशमुखच्या चित्रपटाला मागे टाकत मिळवलं चौथं स्थान

प्रवीण तरडे लिखित, दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करतोय. या चित्रपटाने अवघ्या वीस दिवसांत रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटाच्या कमाईला मागे टाकलं आहे. आतापर्यंत किती कमाई झाली, ते जाणून घ्या..

Deool Band 2 : ‘देऊळ बंद 2’ची कमाई सुसाट; रितेश देशमुखच्या चित्रपटाला मागे टाकत मिळवलं चौथं स्थान
देऊळ बंद 2, वेडImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 11, 2026 | 10:15 AM
Share

स्नेहल तरडे आणि मोहन जोशी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करतोय. 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा थिएटरमध्ये तिसरा आठवडाही दमदार सुरू आहे. अवघ्या दहा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने चांगलं यश मिळवलं आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या मंगळवारी या चित्रपटाने रितेश देशमुखच्या ‘वेड’ या चित्रपटालाही कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे. प्रवीण तरडे लिखित-दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ हा आता सर्वाधिक कमाई करणारा चौथा मराठी चित्रपट ठरला आहे.

गेल्या 20 दिवसांत ‘देऊळ बंद 2’ची कमाई

प्रदर्शनाच्या तिसऱ्या मंगळवारी म्हणजेच 20 व्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1.1 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. एकोणिसाव्या दिवसाच्या तुलनेत विसाव्या दिवशी फक्त 4.34 टक्क्यांची घट झाली. 19 व्या दिवसाची कमाई 1.15 कोटी रुपये झाली होती. या चित्रपटाने आतापर्यंत भारतात 62 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. तर ग्रॉस कलेक्शनचा आकडा 73.16 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या चित्रपटाची गती पाहता येत्या काही दिवसांतच कमाईचा 75 कोटींचा आकडा सहज पार होईल.

‘देऊळ बंद 2’ची कमाई

  • पहिला आठवडा (आठ दिवस)- 30.2 कोटी रुपये
  • दुसरा आठवडा- 22.4 कोटी रुपये
  • सोळावा दिवस- 1.4 कोटी रुपये
  • सतरावा दिवस- 2.6 कोटी रुपये
  • अठरावा दिवस- 3.15 कोटी रुपये
  • एकोणिसावा दिवस- 1.15 कोटी रुपये
  • विसावा दिवस- 1.1 कोटी रुपये
  • एकूण कमाई- 62 कोटी रुपये

62 कोटी रुपयांची कमाई करून ‘देऊळ बंद 2’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर रितेश देशमुखच्या ‘वेड’ या चित्रपटाला सहज मागे टाकलं आहे. ‘वेड’ने 61.2 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता देऊळ बंद 2 हा चित्रपट चौथा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट बनला आहे. तर तिसऱ्या स्थानावर ‘बाईपण भारी देवा’ (76.28 कोटी रुपये) हा चित्रपट आहे. तिसऱ्या स्थानावर पोहोचण्यासाठी ‘देऊळ बंद 2’ला आणखी 14.29 कोटी रुपयांची कमाई करणं गरजेचं आहे.

भारतीय बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारे टॉप 10 मराठी चित्रपट (नेट कलेक्शन)

  1. राजा शिवाजी- 105.64 कोटी रुपये
  2. सैराट- 90 कोटी रुपये
  3. बाईपण भारी देवा- 76.28 कोटी रुपये
  4. देऊळ बंद 2- 62 कोटी रुपये
  5. वेड- 61.2 कोटी रुपये
  6. नटसम्राट- 42 कोटी रुपये
  7. पावनखिंड- 37.72 कोटी रुपये
  8. लय भारी- 37 कोटी रुपये
  9. कट्यार काळजात घुसली- 35 कोटी रुपये
  10. ठाकरे- 31.6 कोटी रुपये

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?