Dharmendra : धर्मेंद्र यांचं पूर्ण कुटुंब स्मशानभूमीवर, पोलीस म्हणाले “निधनाबद्दल कुटुंबीय..”
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. त्यांची तब्येत पुन्हा बिघडली असून घराबाहेर रुग्णवाहिका पोहोचल्याचं कळतंय. धर्मेंद्र गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 10 नोव्हेंबर रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते व्हेंटिलेटरवर होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. धर्मेंद्र यांच्यावर जुहू इथल्या निवासस्थानीच पुढील उपचार करण्यात येतील, अशी माहिती डॉक्टरांनी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांची तब्येत बिघडल्याचं कळतंय. देओल कुटुंबीयांच्या घरी ॲम्ब्युलन्स पोहोचल्याची माहिती आहे. पापाराझींचा त्रास होऊ नये म्हणून घराबाहेर बॅरिकेडिंगसुद्धा करण्यात आली आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल जुहू इथल्या घरी पोहोचली आहे.
‘सनी व्हिला’ या बंगल्याबाहेर दुपारी अचानक गर्दी वाढली. त्यांच्या बंगल्याच्या आवारात एक रुग्णवाहिका प्रवेश करताना दिसली आणि त्यानंतर लगेचच मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव बंगल्याबाहेर बॅरिकेड्स उभारण्यास सुरुवात केली. पोलीस दलाव्यतिरिक्त धर्मेंद्र यांच्या घराबाहेर सुमारे 50 खाजगी सुरक्षा रक्षकांची एक टीमदेखील उपस्थित आहे.
धर्मेंद्र यांचा चुलत भाऊ आणि निर्माते गुड्डू धनोआ यांनी रविवारी त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “ते ठीक आहेत. यापेक्षा अधिक मी काही बोलू शकत नाही. मला तेवढी माहिती नाही. पण ते ठीक आहेत आणि त्यांची प्रकृती हळूहळू सुधारतेय.” मात्र त्यानंतर आता पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
धर्मेंद्र यांच्या घराबाहेरील व्हिडीओ
Mumbai: An Ambulance was seen entering actor Dharmendra’s residence, the area was barricaded 50 meters from the house pic.twitter.com/w16rSACXaB
— IANS (@ians_india) November 24, 2025
89 वर्षीय धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास जाणवल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. धर्मेंद्र रुग्णालयात असताना सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा यांसारख्या कलाकारांनी त्यांची भेट घेतली होती. तर डिस्चार्ज मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन स्वत: कार चालवत धर्मेंद्र यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.
धर्मेंद्र रुग्णालयात असताना त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती. त्यानंतर हेमा मालिनी आणि त्यांची मुलगी इशा देओल यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित अफवा पसरवणाऱ्यांवर राग व्यक्त केला होता. त्याचसोबत अशा पद्धतीच्या खोट्या बातम्या न पसरवण्याची विनंती केली होती. तर देओल कुटुंबीयांनी त्यांच्या खासगीपणाचा आदर करण्याचं आवाहन केलं होतं.
“धर्मेंद्रजींच्या प्रकृतीची आम्हा सर्वांनाच खूप काळजी आहे. त्यांच्या मुलांची तर झोपच उडाली आहे. पण होय, ते घरी आल्यामुळे मी खुश आहे. ते रुग्णालयातून बाहेर पडले, याचा आम्हाला दिलासा आहे. जे लोक त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांच्यासोबत त्यांनी राहणं गरजेचं आहे. बाकी तर सर्व देवाच्याच हातात आहे. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा”, अशा शब्दांत हेमा मालिनी व्यक्त झाल्या होत्या.
