AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र आता हेमा मालिनी नाही तर या व्यक्तीसोबत राहतात एकत्र; त्याबद्दल हेमा यांनी म्हटलं, “मला त्याबद्दल दुःख…”

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत बातम्या समोर येत असातानाच त्यांची तब्येत आता स्थिर असून रुटीन चेकअपसाठी त्यांनी रुग्णालयात घेऊन जाण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान धर्मेंद्र यांच्याबद्दल ही एक गोष्टी फार कमी जणांना माहित असेल ती म्हणजे धर्मेंद्र कित्येक वर्ष झाली हेमा मालिनी नाही तर या व्यक्तीसोबत राहत आहेत. 

धर्मेंद्र आता हेमा मालिनी नाही तर या व्यक्तीसोबत राहतात एकत्र; त्याबद्दल हेमा यांनी म्हटलं, मला त्याबद्दल दुःख...
Dharmendra is no longer living with Hema Malini but with his first wife Prakash Kaur.Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 10, 2025 | 8:46 PM
Share

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत बातम्या समोर येत आहे. धर्मेंद्र हे वयाशी संबंधित आजारांशी झुंजत आहेत. त्यांना बऱ्याच काळापासून अनेक आरोग्य समस्या आहेत. त्यांना 31 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना नियमित तपासणीसाठी दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. तथापि, आता त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब सध्या रुग्णालयात त्यांच्यासोबत आहे. आताही त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केल्याचं म्हटलं जात आहे.

धर्मेंद्र वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत

धर्मेंद्र हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात प्रसिद्ध आणि हँडसम अभिनेता मानले जायचे. त्यांना ‘ही मॅन’ म्हटलं जायचं. त्यांची फॅनफॉलोईंग इतकी जबरदस्त होती की चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी वेडे व्हायचे. धर्मेंद्र त्यांच्या चित्रपटासाठी जेवढे प्रसिद्ध होते तेवढेच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत होते. चर्चा तर तेव्हा जास्त झाली जेव्हा त्यांनी विवाहित असतानाही हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रेमकहाणी 

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रेमकहाणी सर्वांनाच माहित आहे. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे वैवाहिक जीवन आजही चर्चेचा विषय आहे. धर्मेंद्र यांनी त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर हिला घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले. एवढंच नाही तर त्यांनी हेमा यांच्याशी लग्न करण्यासाठी धर्मांतरही केले. त्यांना ईशा देओल आणि अहाना देओल या दोन मुली आहेत. तर पहिल्या पत्नीपासून त्यांना सनी देओल आणि बॉबी देओल अशी दोन मुले आहेत.

धर्मेंद्र आता हेमा मालिनी नाही तर या व्यक्तीसोबत राहत आहेत 

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नामुळे नक्कीच त्यांच्या पहिल्या पत्नीला धक्का बसला होता. त्यांच्यात बरेच वादही होते. पण तरी देखील त्यांचे दोन्ही कुटुंबाचे धर्मेंद्र यांवरील प्रेम मात्र कमी झाले नाही. त्यांनी दोन्ही कुटुंबांना धरून ठेवलं. दरम्यान धर्मेंद्र गेल्या अनेक वर्षांपासून हेमा मालिनी नाही तर पहिल्या पत्नी प्रकाश कौरकडे परत आले आणि राहू लागले आहेत.

हेमा मालिनी यांचे स्पष्ट मत 

जेव्हा हेमा मालिनी यांना विचारण्यात आले की त्यांना याबद्दल वाईट वाटते का, तेव्हा त्यांनी म्हटले की “मी स्वतःसोबत आनंदी आहे” एका मुलाखतीत जेव्हा हेमा यांना विचारण्यात आले की धर्मेंद्र आता तिच्यासोबत राहत नाहीत तर त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत राहतात याबद्दल त्यांना वाईट वाटते का, तेव्हा हेमा म्हणाल्या, “मला त्याबद्दल वाईट वाटत नाही आणि मला त्याबद्दल दुःखही नाही. मी स्वतःसोबत फार आनंदी आहे. मला दोन मुली आहेत आणि मी त्यांना खूप चांगले वाढवले ​​आहे. अर्थात, धर्मेंद्र आमच्यासोबत राहत नसले तरी देखील ते नेहमीच आमच्या पाठिशी होते. अगदी सर्वत्र.”

“मी त्यांचा खूप आदर करते”

तसेच हेमा पुढे म्हणाल्या की तिला धर्मजींच्या पहिल्या पत्नीबद्दल त्यांना खूप आदर आहे. त्या म्हणाल्या की, “जरी मी प्रकाशबद्दल कधीही बोलले नाही, तरी मी त्यांचा खूप आदर करते. माझ्या मुलीही धर्मजींच्या कुटुंबाचा आदर करतात. जगाला माझ्या आयुष्यातील प्रत्येक बारकावे जाणून घ्यायचे आहेत, परंतु त्यांनी स्वतःचे काम करावे.”

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.