AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र यांच्या संपत्तीची वाटणी कशी होईल? ईशा-अहाना देओल यांचा हक्क किती? हेमा मालिनी यांना मालमत्तेत वाटा नाही

अभिनेते धर्मेंद्र यांची कोट्यवधींची संपत्ती आहे. त्यांना दोन पत्नी आणि सहा मुलं आहेत. त्यांच्या संपत्तीतून कोणाला काय मिळेल, याबद्दल कायदा काय म्हणतो, ते सविस्तर जाणून घेऊयात. 89 वर्षीय धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धर्मेंद्र यांच्या संपत्तीची वाटणी कशी होईल? ईशा-अहाना देओल यांचा हक्क किती? हेमा मालिनी यांना मालमत्तेत वाटा नाही
Dharmendra's familyImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 11, 2025 | 10:38 PM
Share

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी त्यांच्या दमदार अभिनयकौशल्याने बॉलिवूड इंडस्ट्रीत खूप नाव कमावलं आहे. 89 व्या वर्षीही त्यांचा जबरदस्त चाहतावर्ग आहे. बॉक्स ऑफिसवर त्यांच्या चित्रपटांची तगडी कमाई होते. धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती 450 कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यांच्या प्रॉपर्टीची यादी खूप मोठी आहे. वयाच्या 89 व्या वर्षीही ते चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांचा ‘इक्कीस’ हा चित्रपट येत्या डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट आणि बिझनेस गुंतवणुकीतून त्यांची कमाई होते. याशिवाय त्यांचा मुंबईत एक आलिशान बंगला आहे. तर खंडाळा आणि लोणावळामध्ये त्यांचे फार्महाऊस आहेत. त्यांच्याकडे इतरही अनेक रिअल इस्टेट प्रॉपर्टीज आहेत. ‘गरम-धरम’ या नावाने त्यांच्या रेस्टॉरंटची चेनसुद्धा लोकप्रिय आहे. विविध शहरांमध्ये त्यांच्या रेस्टॉरंटच्या शाखा आहेत.

धर्मेंद्र यांचा परिवार

धर्मेंद्र यांनी दोन लग्न केले आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव प्रकाश कौर आणि दुसऱ्या पत्नीचं नाव हेमा मालिनी आहे. दोन्ही पत्नींकडून धर्मेंद्र यांना सहा मुलं आहेत. पहिल्या पत्नीपासून धर्मेंद्र यांना चार मुलं आहेत. सनी देओल, बॉबी देओल, अजीता देओल आणि विजेता देओल अशी त्यांची नावं आहेत. तर दुसरी पत्नी हेमा मालिनी यांच्याकडून त्यांना दोन मुली आहेत. ईशा देओल आणि अहाना देओल अशी त्यांची नावं आहेत.

धर्मेंद्र यांची 13 नातवंडं

सनी देओल- दोन मुलं, करण देओल आणि राजवीर देओल बॉबी देओल- दोन मुलं, धर्म आणि आर्यमन देओल अजीता देओल- दोन मुली विजेता देओल- एक मुलगा आणि एक मुलगी ईशा देओल- दोन मुली, राध्या तख्तानी आणि मिराया तख्तानी अहाना देओल- डेरिना वोहरा (मुलगा), जुळ्या मुली- अस्त्रिया वोहरा आणि आदिया वोहरा

धर्मेंद्र यांच्या संपत्तीच्या वाटणीबद्दल कायदा काय म्हणतो?

दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील कमलेश कुमार मिश्रा यांनी ‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या निर्णयाने- रेवणसिद्धप्पा विरुद्ध मल्लिकार्जुन (2023 INSC 783) हे संपूर्ण प्रकरण स्पष्ट केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय?

2023 च्या निकालानुसार, जर एखाद्या व्यक्तीचं दुसरं लग्न हिंदू विवाह कायद्याअंतर्गत रद्दबातल मानलं गेलं असेल तरीसुद्धा त्या लग्नातून जन्मलेली मुलं कायद्याच्या दृष्टीने वैध मानली जातील. धर्मेंद्र यांनी पहिली पत्नी प्रकाश कौरला घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं आहे. कलम 16 (1) अंतर्गत, अशा मुलांना त्यांच्या पालकांच्या संपत्तीवर पूर्ण अधिकार असतील. परंतु हे अधिकार फक्त आईवडिलांच्या संपत्तीपुरते मर्यादित असतील. म्हणजेच संयुक्त कुटुंब किंवा वडिलोपार्जित संपत्तीवर त्यांचा थेट अधिकार नसेल.

ईशा आणि अहाना देओल यांचा संपत्तीत किती वाटा?

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांची वडिलोपार्जित संपत्ती विभागली जाईल आणि धर्मेंद्र यांच्या नावावर असलेला वाटा त्यांच्या सर्व कायदेशीर वारसांमध्ये समान विभाजित केला जाईल. हिंदू विवाह कायद्यानुसार हेमा मालिनी यांच्याशी धर्मेंद्र यांचं दुसरं लग्न जरी रद्दबातल मानलं जात असलं तरी (कारण प्रकाश कौर यांच्याशी त्यांचं पहिलं लग्न अजूनही लागू होतं) HMA च्या कलम 16 (1) नुसार धर्मेंद्र यांच्या मुलींना त्यांच्या पालकांच्या संबंधात कायदेशीर मुलांचा दर्जा मिळतो. त्यामुळे ईशा देओल आणि अहाना देओल यांना धर्मेंद्र यांच्या मालमत्तेतील समान वाटा मिळेल. त्याचप्रमाणे सनी, बॉबी, अजीता आणि विजेता यांनाही समान वाटा मिळेल.

धर्मेंद्र यांच्या मालमत्तेवर कोणाचा हक्क असेल?

धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर आणि त्यांची मुलं- सनी, बॉबी, अजीता आणि विजेता, त्याचप्रमाणे त्यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली- ईशा आणि अहाना हे सर्वजण धर्मेंद्र यांच्या वारशाचे समान वारस मानले जातील. धर्मेंद्र यांच्या सहाही मुलांना वडिलांच्या संपत्तीत समान हक्क मिळतील.

हेमा मालिनी यांना धर्मेंद्र यांच्या मालमत्तेत वाटा मिळणार नाही. कारण त्यांचं लग्न हिंदू विवाह कायद्यानुसार वैध मानलं जात नाही. त्यामुळे धर्मेंद्र यांनी मृत्यूपत्रात उल्लेख केल्यास किंवा लग्नाची वैधता न्यायालयात सिद्ध झाल्यासच हेमा मालिनी यांना वाटा मिळेल.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.