AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2 Ending Explained: ना घरी, ना नवीन मिशन.. ‘धुरंधर 2’च्या क्लायमॅक्सचा अर्थ काय? दिग्दर्शकाकडून मोठी हिंट?

Dhurandhar 2 Ending Explained: 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये हमजाला घरी जाताना दाखवण्यात आलं आहे. परंतु तो घरात प्रवेश करत नाही आणि तिथून परतही जात नाही, मग नेमकं क्लायमॅक्समध्ये काय होतं, ते जाणून घ्या..

Dhurandhar 2 Ending Explained: ना घरी, ना नवीन मिशन.. 'धुरंधर 2'च्या क्लायमॅक्सचा अर्थ काय? दिग्दर्शकाकडून मोठी हिंट?
Ranveer SinghImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 22, 2026 | 10:22 AM
Share

सध्या थिएटरपासून सोशल मीडियापर्यंत.. सर्वत्र केवळ आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ याच चित्रपटाची चर्चा आहे. गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षक या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत होते. अखेर 19 मार्च रोजी हा चित्रपट जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. सोशल मीडियावर या चित्रपटातील अनेक सीन्स व्हायरल होत आहेत. त्यापैकीच एक सीन हा क्लायमॅक्सचा आहे. ‘धुरंधर 2’चा शेवट एका शांत आणि भावूक वळणावर होतो. रणवीर सिंहची भूमिका हमजा अली मजारी पाकिस्तानात त्याचं मिशन पूर्ण करून भारतात परत येतो. जसकीरत सिंह रंगी ही खरी ओळख घेऊन तो मायदेशी परततो.

या अत्यंत भावूक वळणावर या चित्रपटाचा शेवट होतो, ज्यामध्ये जसकीरत त्याच्या आई आणि बहिणीला घरापासून लांब उभा राहून बघत असतो. परंतु तो घरात जात नाही. तिथेच रस्त्यावर तो भावूक होऊन उभा राहतो. मग ‘धुरंधर 2’च्या या क्लायमॅक्सचा नेमका अर्थ काय होतो? हमजा त्याच्या घरी परत जातो की देशसेवेसाठी पुन्हा नव्या मिशनवर जातो? आदित्य धरने तिसऱ्या भागासाठी काही कथा राखून ठेवली आहे का, असे अनेक प्रश्न इथे उपस्थित होतात.

क्लायमॅक्सचा अर्थ काय?

आपलं मिशन पूर्ण करून हमजा भारतात परत येऊन अजय सन्यालला भेटतो. मात्र आपल्या ऑपरेशनबद्दल अधिकाऱ्यांना अधिकृतपणे माहिती देण्यापूर्वीच तो त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी पठाणकोटला जातो. पगडी घातलेला जसकीरत दुरूनच त्याच्या आईला आणि बहिणीला पाहतो. तो त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु नंतर त्यांना न भेटताच तो माघारी फिरतो आणि निघून जातो. या क्लायमॅक्सच्या दृश्यात आदित्य धरने हमजाच्या आयुष्यातील बदल आणि त्याच्या मिशनची भावनिक किंमत काय होती, हे अधोरेखित केलं आहे. हमजा त्याच्या कुटुंबीयांच्या अगजी जवळ येऊनसुद्धा तो त्यांना भेटू शकत नाही. शिवाय, तेसुद्धा त्याच्याशिवाय आनंदी आयुष्य जगत आहेत. त्यामुळे तो त्यांना न भेटताच निघून जाण्याचा निर्णय घेतो.

‘धुरंधर 3’ येणार?

जसकीरत त्याच्या कुटुंबाला न भेटता पुढे कुठे जातो किंवा तो कोणाला भेटतो, या प्रश्नाचं उत्तर या दुसऱ्या भागात मिळत नाही. दिग्दर्शक आदित्य धरने त्याच्या मुख्य पात्राचं भविष्य अनिर्णित ठेवलं आहे. यातून त्याने ‘धुरंधर 3’बद्दल संकेत दिले आहेत का, असाही प्रश्न उपस्थित होतो. परंतु याबद्दलची अधिकृत घोषणा मात्र करण्यात आलेली नाही. आदित्यने त्याच्या या चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांनी आपापला अर्थ काढण्यासाठी खुला ठेवला आहे, असंही म्हणायला हरकत नाही. जसकीरतचं पुढे काय झालं असेल, हे ठरवण्याची जबाबदारी त्याने प्रेक्षकांवर सोडली आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?