AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2 : सगळीकडे फक्त बंदुकीच्या फैरींचा आवाज, अस्लम चौधरीचा ‘ऑपरेशन ल्यारी’चा खरा व्हिडीओ समोर

Dhurandhar 2 : खऱ्या अस्लम चौधरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल, सगळीकडे फक्त बंदुकीच्या फैरींचा आवाज... 'ऑपरेशन ल्यारी'चा खरा व्हिडीओ पाहिल्यानंतर म्हणाल...

Dhurandhar 2 :  सगळीकडे फक्त बंदुकीच्या फैरींचा आवाज, अस्लम चौधरीचा  'ऑपरेशन ल्यारी'चा खरा व्हिडीओ समोर
Aslam chudhari
| Updated on: Mar 26, 2026 | 10:46 AM
Share

Dhurandhar 2 : अभिनेता रणवीर सिंग स्टारर स्पाय (Spy Thriller) ‘धुरंधर 2’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवली आहे… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘धुरंधर 2’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. फक्त भारतातन नाही तर, परदेशात देखील सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. सिनेमातील सर्वत भूमिकांचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण अभिनेता संजय दत्त याने साकारलेल्या अस्लम चौधरी या भूमिकेला सर्वांनी डोक्यावर घेतलं आहे… सिनेमातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असताना, ‘ऑपरेशन ल्यारी’चा खरा व्हिडीओ समोर आला आहे…

‘धुरंधर 2’ सिनेमाचा बोलबाला सुरु असताना ऑपरेशन ल्यारी दरम्यानचा अस्लम चैधरी याचा खरा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, अस्लम कराचीच्या ल्यारी परिसरात एक अत्यंत धोकादायक गुन्हेगारीविरोधी कारवाई करताना दिसत आहे.

अस्लम चौधरी हा गुन्हेगारीविरोधातील त्याच्या कठोर भूमिकेसाठी ओळखला जात होता आणि त्याने या भागातील गुन्हेगारी टोळ्यांच्या नेटवर्कला लक्ष्य करून अनेक पोलीस मोहिमांचे नेतृत्व केलं. हा व्हिडिओ त्याच्या गँग हिंसाचारावरील सर्वात मोठ्या कारवाईपैकी एकातील क्षण दाखवतो.

व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे, गोळीबार सुरु आहे आणि एक पत्रकार घडत असलेल्या सर्व घटनांची माहिती देताना दिसत आहे. गोळींचा आवज, भयानक परिस्थिती आणि समोर दिसत असलेला अस्लम चौधरी… ‘धुरंधर 2’ सिनेमा प्रदर्शिक झाल्यानंतर अस्लम चैधरी याचा खरा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे ऑपरेशन ल्यारी?

ऑपरेशन ल्यारी (Operation Lyari) कराची येथील गँग हिंसेवर आळा घाल्यासाठी पोलिसांकडून करण्यात आलेला एक मोठा अभिनयान होता… अस्लम चौधरी याला कायम ‘एनकाउंटर स्पेशलिस्ट’ असं म्हटलं जायचं. अस्लम चौधरी त्याच्या आक्रमक शैलीमुळे आणि गुन्हेगारी टोळ्यांशी वारंवार होणाऱ्या संघर्षांमुळे बराच प्रसिद्ध झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ सिनेमातील एका सीनशी मिळताजुळता आहे, ज्यामुळे लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘धुरंधर 2’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, 19 मार्च रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. एका आठवड्यात सिनेमाने दमदार कमाई केली आहे. जगभरात सिनेमा 900 कोटींचा गल्ला पार केला आहे. सिनेमात रणवीर आणि संजय यांच्यासोबत अभिनेता अर्जुन रामपाल, आर माधवन आणि सारा अर्जुन यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

Follow Us
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?.
खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 3 मंत्री, म्हणून अशोक खरातचा एन्काऊंटर?
खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 3 मंत्री, म्हणून अशोक खरातचा एन्काऊंटर?.
दादांच्या घातपाताचा कट? मुडदाही खोदून काढू; मुख्यमंत्र्यांनी घेतला....
दादांच्या घातपाताचा कट? मुडदाही खोदून काढू; मुख्यमंत्र्यांनी घेतला.....
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.