AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2 : अल्पवयीन मुलाला घेऊन बाबा गेले ‘धुरंधर 2’ बघायला, थिएटर स्टाफने अडवताच जे झालं ते पहा..

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट अ प्रमाणपत्र मिळालेला असल्याने अल्पवयीन मुलांना किंवा मुलींना थिएटरमध्ये तो पाहता येणार नाही. असं असूनही लखनौमधील एक वडील त्याच्या अल्पवयीन मुलासोबत थिएटरमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते.

Dhurandhar 2 : अल्पवयीन मुलाला घेऊन बाबा गेले 'धुरंधर 2' बघायला, थिएटर स्टाफने अडवताच जे झालं ते पहा..
Ranveer SinghImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 23, 2026 | 3:48 PM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट 19 मार्चपासून थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक प्रचंड गर्दी करत आहेत. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ‘अ’ (A) प्रमाणपत्र दिलं आहे. म्हणजेच 18 वर्षांखालील मुलांना किंवा मुलींना थिएटरमध्ये हा चित्रपट बघण्याची परवानगी नाही. सिनेमागृहात प्रवेश देण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांकडून या गोष्टीची काळजी घेतली जाते. परंतु याच मुद्द्यावरून लखनौमधील एक थिएटरमध्ये जोरदार हाणामारी झाली. लखनौच्या या थिएटरमध्ये जेव्हा एका स्टाफने अल्पवयीन मुलाला ‘धुरंधर 2’चा शो नाकारला, तेव्हा त्याच्या वडिलांनी कर्मचाऱ्यांशीच हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

नेमकं काय घडलं?

एक व्यक्ती त्याच्या अल्पवयीन मुलासोबत ‘धुरंधर 2’ पाहण्यासाठी लखनौमधील थिएटरमध्ये गेली होती. परंतु थिएटरच्या कर्मचाऱ्यांनी त्या अल्पवयीन मुलाला आत जाण्यापासून रोखलं. हे पाहून मुलाच्या वडिलांनी थेट कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने थिएटरच्या स्टाफला सांगितलं की, “माझा मुलगा हा चित्रपट पाहण्याच्या वयाचा आहे.” परंतु तरीही कर्मचारी हे मानायला तयार नव्हते. त्यांनी त्याच्या वयाचा पुरावा देण्यास विचारलं असता वडिलांनी कर्मचाऱ्यावरच हात उचलला. त्यानंतर हा वाद आणखी चिघळला. अखेर थिएटरच्या सुरक्षा रक्षकांनी येऊन हा वाद सोडवला.

View this post on Instagram

A post shared by India ego (@indiaego)

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. ‘नियम मोडणं हे भारतात मस्करी झाली आहे,’ असं एकाने लिहिलं. तर ‘वडिलांना त्यांच्या मुलासोबत हा चित्रपट पहायला आहे, त्यांचे संस्कार उच्च आहेत’, असा उपरोधिक टोला दुसऱ्या युजरने लगावला. ‘हे जरा अती झालं’, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

‘धुरंधर 2’ या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या तीन महिन्यांपासून प्रतीक्षा करत होते. डिसेंबर 2025 मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. त्यामुळे अगदी पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली होती. अनेक ठिकाणी हाऊसफुलच्या बोर्ड्स झळकत आहेत. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत तब्बल 400 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. यावरून या चित्रपटाची क्रेझ किती आहे, हे लक्षात येतं.

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!