AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar : ‘धुरंधर अद्याप संपलेला नाही…’, प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राइज प्लान, कोणी केला मोठा खुलासा?

Dhurandhar : 'धुरंधर' सिनेमाने फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही तर, चाहत्यांच्या मनावर देखील राज्य केलं. आता वर्षाच्या शेवटी देखील निर्माते प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राइज प्लान केलं आहे... जाणून घ्या कोणी केला मोठा खुलासा...

Dhurandhar : 'धुरंधर अद्याप संपलेला नाही...', प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राइज प्लान, कोणी केला मोठा खुलासा?
Dhurandhar
| Updated on: May 08, 2026 | 9:41 AM
Share

Dhurandhar : ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ सिनेमाने फक्त चाहत्यांच्या मनावर नाही तर, बॉक्स ऑफिसवर देखील रज्य केलं. सिनेमा प्रदर्शित होऊन काही महिने देखील झाले आहेत, पण आजही ‘धुरंधर’ची असलेली क्रेझ कमी झालेली नाही. सिनेमात अभिनेता रणवीर सिंग याने महत्त्वाची भूमिका साकारली होती, तर दिग्दर्शक आदित्य धर याच्या खांद्यावर दिग्दर्शनाची जबाबदारी होती. सिनेमाची चर्चा अद्यापही सुरु असताना, सिनेमाच्या मेकर्सनी मोठी हिंट दिली आहे. वर्षाच्या शेवटपर्यंत ‘धुरंधर’ संबंधी मोठं सरप्राइज प्रेक्षकांना भेटणार आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत जिओ स्टुडिओच्या निर्मात्या ज्योती देशपांडे यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांना विचारण्यात आलं, सिनेमा हीट झाल्यानंतर आदित्य धर आता काही काळ आराम करणार आहेत? यावर देशपांडे म्हणाल्या, ‘धुरंधर अद्यापही पूर्णपणे संपलेला नाही… आम्ही या वर्षाच्या शेवटीस प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राइज घेऊन येणार आहोत, आमच्याकडे काही खास आहे…’, यावेळी ज्योती यांनी अधिक काहीही सांगितलं नाही. त्यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मात्र चर्चांनी मोठा जोर धरला आहे.

अनेक चाहत्यांना वाटतं की निर्माते सिनेमाचे बिहाइंड द सीन्स (BTS) डॉक्यूमेंट्री प्रदर्शित करू शकतात. एका नेटकऱ्याने ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं, “जर धुरंधरची BTS डॉक्यूमेंट्री या वर्षी प्रदर्शित करण्यात आणि त्यानंतर मौर्य ट्रायलॉजीची घोषणा झाली, तर ते एक स्वप्न सत्यात उतरल्यासारखं होईल.”

‘धुरंधर’ सिनेमातील स्टारकास्ट

अभिनेता रणवीर सिंग स्टारर आणि दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ सिनेमा डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाला. त्यानंतर मार्च 2026 मध्ये ‘धुरंधर 2’ सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमात रणवीर याच्यासोबत अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर माधवन आणि सारा अर्जुन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

सिनेमाची कथा जसकिरत सिंग रंगी उर्फ ​​हमजा अली मजारी याच्याभोवती फिरते, ज्याला एका दहशतवादी नेटवर्कला संपवण्यासाठी पाकिस्तानच्या ल्यारी भागात पाठवलं जातं या. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवलं. ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ सिनेमाने फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील मोठी कमाई केली. अनेक हीट सिनेमांचे रेकॉर्ड ‘धुरंधर’ सिनेमाने मोडले आहेत.

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?