Video | पहिल्यांदाच मातृत्व सुख अनुभवणाऱ्या दिया मिर्झानेही आरोग्यासाठी अवलंबला करीना-अनुष्काचा मार्ग, पाहा खास व्हिडीओ…

Video | पहिल्यांदाच मातृत्व सुख अनुभवणाऱ्या दिया मिर्झानेही आरोग्यासाठी अवलंबला करीना-अनुष्काचा मार्ग, पाहा खास व्हिडीओ...
दिया मिर्झा

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) सध्या तिच्या गर्भावस्थेचा आनंद घेत आहे. काही दिवसांपूर्वीच दियाने बेबी बंपसह फोटो शेअर करुन चाहत्यांना ही गुडन्यूज दिली होती.

Harshada Bhirvandekar

|

Apr 09, 2021 | 11:54 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) सध्या तिच्या गर्भावस्थेचा आनंद घेत आहे. काही दिवसांपूर्वीच दियाने बेबी बंपसह फोटो शेअर करुन चाहत्यांना ही गुडन्यूज दिली होती. कोव्हिडसारख्या कठीण काळात जिथे प्रत्येकजण घरीच राहून स्वत:ची काळजी घेत आहे, अशा वेळी दियादेखील स्वतःला फिट ठेवण्यासाठी घरीच वर्कआऊट करत आहे. दियाने तिचा वर्कआऊट (pregnancy workout) व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या घराच्या छतावर काही व्यायाम करताना दिसत आहे. पांढर्‍या टी-शर्ट आणि लोअरमध्ये दिया ट्रेनरच्या मदतीने वर्कआऊट करत आहे. या दरम्यान, दियाचा बेबी बंप देखील दिसतो आहे (Dia Mirza share pregnancy workout video on social media).

पाहा दियाचा व्हिडीओ

नुकताच दियाने एका खास फोटो पोस्टसोबत आपण गर्भवती असल्याची घोषणा केली होती. तिने आपला बेबी बंप फोटो शेअर करत लिहिले की, ‘आनंद होतोय…जीवनाच्या शक्तींसह, ती सुरुवात ही सर्वकाही असते. माझ्या गर्भाशयात असणाऱ्या या चिमुकल्या जीवाची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळाली याचा मला फार आनंद होत आहे.

मात्र, जेव्हा दियाने ही घोषणा केली तेव्हा तिला बर्‍याच लोकांनी ट्रोल केले होते. वास्तविक, दिया आणि वैभवचे फेब्रुवारी महिन्यातच लग्न झाले होते. अर्थात दिया लग्नाआधीच गर्भवती असल्याने तिला ट्रोल केले गेले होते. त्याचवेळी एका वापरकर्त्याने दिव्याच्या लग्नावरही प्रश्न उपस्थित केला होता. ती कमेंट अशी होती की, ‘दिया खूप ओपन माइंडेड आहे. तिने लग्नात महिला पंडिताला बोलावले होते, तर मग गर्भवती झाल्यावरच तिने लग्न का केले? लग्न न करताही ती आई होऊ शकली असती.’(Dia Mirza share pregnancy workout video on social media)

दिया मिर्झाने दिलं उत्तर!

“इंटरेस्टिंग प्रश्न. पहिले म्हणजे आम्हाला मूल होणार आहे, म्हणून आम्ही लग्न केले नाही. आम्हाला आयुष्य एकत्र घालवायचे असल्यामुळे आम्ही लग्न करणार होतो. लग्नाची तयारी करत असताना आपल्याला बाळ होणार असल्याचे आम्हाला समजले. म्हणजे, हे लग्न गर्भधारणेमुळे झालेले नाही. वैद्यकीय कारणांमुळे सुरक्षिततेची हमी मिळेपर्यंत आम्ही प्रेग्नन्सीची बातमी फोडली नाही. ही माझ्या आयुष्यातील अत्यानंदाची गोष्ट आहे. मी अनेक वर्ष या गोष्टीची वाट पाहत होते. त्यामुळे वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त कुठल्याही कारणासाठी ते लपवण्याचा प्रश्नच येत नाही.” असे दियाने कमेंटला उत्तर देताना स्पष्ट केले.

दियाने सांगितली पाच कारणे

“तुमच्या प्रश्नाची उत्तरं देते, कारण

  1. मूल होणे हे आयुष्यातील सर्वात सुंदर गिफ्ट आहे
  2. या सुंदर प्रवासाशी कधीच लज्जेचा संबंध येता कामा नये
  3. महिला म्हणून आपण कायम आपल्या आवडी-निवडी लक्षात घ्याव्यात
  4. सिंगल राहून मूलाचे पालनपोषण करावे किंवा लग्नानंतर, हा सर्वस्वी आपला निर्णय आहे
  5. काय योग्य आणि काय अयोग्य याचे पूर्वग्रह समाज म्हणून दूर करावेत” असेही दियाने सांगितले.

चार वर्षांनी लहान वैभवशी दुसरा विवाह

15 फेब्रुवारीला उद्योगपती वैभव रेखी याच्यासोबत दिया मिर्झाचा विवाह झाला. दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. वैभव हा दियापेक्षा चार वर्षांनी लहान आहे. सध्या ते वाद्र्यातील पाली हिल भागात राहतात. वैभव हा इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. दियाने आपल्या नात्याविषयी जाहीर कबुली लग्न होईपर्यंत दिली नव्हती. मात्र ते 2020 मध्ये भेटल्याचं बोललं जातं. लॉकडाऊनच्या काळात ते एकत्रच राहत होते.

(Dia Mirza share pregnancy workout video on social media)

हेही वाचा :

Happy Birthday Jaya Bachchan | हरिवंशराय बच्चन यांच्या एका अटीमुळे झाले जया-अमिताभचे लग्न, वाचा किस्सा…

Mangalashtak Return : ‘मंगलाष्टक रिटर्न’ चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण करणार दोन नवे चेहरे!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें