Mangalashtak Return : ‘मंगलाष्टक रिटर्न’ चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण करणार दोन नवे चेहरे!

विशेष म्हणजे 'घटस्फोट लग्नसोहळा' ही सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही पोस्ट याच 'मंगलाष्टक रिटर्न' चित्रपटातील आहे, नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून थिएटर चालू होताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज आहे

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 5:00 AM, 9 Apr 2021
Mangalashtak Return : 'मंगलाष्टक रिटर्न' चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण करणार दोन नवे चेहरे!
शीतल अहिरराव आणि वृषभ शहा

मुंबई : पुन्हा एकदा मराठी सिनेसृष्टी चित्रपटगृह हाऊसफुल करण्यासाठी सज्ज झाली आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या कथा, सादरीकरण यासह आता सिनेमात कलाकारांच्या नव्या फ्रेश जोड्या आणण्याकडेही सिनेमाकर्त्यांचा कल आहे. नवीन जोड्यांचा हा ट्रेंड सुरू असताना लवकरच अभिनेता वृषभ शहा (Vrushabh Shah) आणि अभिनेत्री शीतल अहिरराव (Sheetal Ahirrao) यांच्या नव्या जोडीची पर्वणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे (Mangalashtak Return Sheetal Ahirrao and Vrushabh Shah debuting in industry).

पहिल्यांदाच एकत्र काम करत असलेल्या या कलाकारांची पडद्यावरील नवी केमिस्ट्री निर्माता वीरकुमार शहा आणि ‘शारदा प्रॉडक्शन’ या प्रॉडक्शन हाऊसतर्फे प्रेक्षकांच्या मनोरंजनास सज्ज आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक योगेश भोसले यांनी सांभाळली आहे.

नवे कलाकार नवी जोडी!

अभिनेत्री शीतल अहिरराव आणि अभिनेता वृषभ शाह ‘मंगलाष्टक रिटर्न’ (Mangalashtak Return ) या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. कलाकार म्हणून अंगी असलेल्या मनोरंजन क्षेत्रातल्या या नव्या  उभारत्या ताऱ्यांच्या कलेला साऱ्याच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. सातत्याने नवे कोरे आणि चौकटी बाहेरचे विषय असलेले चित्रपट स्वीकारणारी शीतल आणि दमदार भूमिका स्वीकारत नवकलाकार म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आलेला वृषभ शहा या चित्रपटातून आपली कला नक्कीच प्रेक्षकांच्या मनावर उमटवतील यांत शंकाच नाही.

बहुचर्चित ‘घटस्फोट सोहळा’

विशेष म्हणजे ‘घटस्फोट लग्नसोहळा’ ही सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही पोस्ट याच ‘मंगलाष्टक रिटर्न’ चित्रपटातील आहे, नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून थिएटर चालू होताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज आहे (Mangalashtak Return Sheetal Ahirrao and Vrushabh Shah debuting in industry).

दिग्गज कलाकारांची फौज

कोरोनाच्या प्रादुर्भावात अटी शर्थीचे पालन करत आणि कलाकारांच्या मदतीने या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्णत्वास आले आहे. चित्रपटाचे विषयघन आणि गमतीदार नावासह आणि चित्रपटातील कलाकारांबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षकांनाही आतुरता लागून राहिली आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक, आनंद इंगळे, प्रसन्न केतकर, कमलेश सावंत, भक्ती चव्हाण हे कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत. पुन्हा एकदा उभारती अशी ही जोडी वेगळ्या धाटणीच्या या सिनेमातून  सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य नक्कीच गाजवेल याची खात्री आहे. शीतल आणि वृषभ यांच्या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यास सिनेरसिकही उत्सुक आहेत.

नक्की घटस्फोट सोहळ्याची थीम काय आहे ?

नक्की घटस्फोट सोहळ्याची थीम काय आहे, हा आगळावेगळा सोहळा कशाचे भाकीत उलगडणार याकडे रसिक प्रेक्षकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. या चित्रपटा अंतर्गत होणाऱ्या या घटस्फोट सोहळ्याने तर सोशल मीडियावर हाहाकारच माजवला होता. त्यामुळे प्रेक्षकांमधील चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माता वीरकुमार शहा यांनी सांभाळली असून, त्यांच्या ‘शारदा प्रॉडक्शन’ या प्रॉडक्शन हाऊसतर्फे चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

(Mangalashtak Return Sheetal Ahirrao and Vrushabh Shah debuting in industry)

हेही वाचा :

Video | कोरोना टेस्ट निगेटिव्ह येताच गोविंदाने भन्नाट स्टाईलमध्ये व्यक्त केला आनंद! पाहा व्हिडीओ…

‘देवमाणूस’ ज्यापासून प्रेरित, त्या डॉ. संतोष पोळने जिवंतपणी गाडले सहा जणांना