AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्युनिअर विराट येतोय.. अखेर अनुष्का शर्माने जाहीर केली प्रेग्नंसी? पहा व्हिडीओ

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्या घरात पुन्हा एकदा चिमुकल्या पाहुणीचं किंवा पाहुण्याचं आगमन होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चांदरम्यानच अनुष्काने सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून नेटकरी थेट दोघांना शुभेच्छा देत आहेत.

ज्युनिअर विराट येतोय.. अखेर अनुष्का शर्माने जाहीर केली प्रेग्नंसी? पहा व्हिडीओ
Virat Kohli and Anushka SharmaImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 20, 2023 | 8:07 AM
Share

मुंबई : 20 डिसेंबर 2023 | अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई बनणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. मात्र त्याबाबत विराट कोहली किंवा अनुष्काने अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. आता अनुष्काने सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला थेट शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का प्रेग्नंसीबद्दल बोलताना दिसतेय. ‘ज्युनिअर विराट येतोय..’ असे कमेंट्स चाहते या व्हिडीओवर करू लागले आहेत.

अनुष्का शर्माने नुकतीच इन्स्टाग्रामवर एका प्रेग्नंसी टेस्ट किटची जाहिरात शेअर केली आहे. ही जाहिरात पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये विराट आणि अनुष्काला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. अनुष्काने अप्रत्यक्षपणे तिच्या प्रेग्नंसीची हिंट दिली आहे, असं नेटकरी म्हणत आहेत. ‘आम्ही तुझा इशारा समजतोय’, असं एकाने लिहिलं. तर ‘याचा अर्थ तू दुसऱ्यांदा गरोदर आहेस’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘छोटा विराट येतोय’, अशाही शब्दांत चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘अनुष्का शर्मा प्रेग्नंट आहे, कन्फर्म’, असंही काहींनी लिहिलं आहे.

काही दिवसांपूर्वी अनुष्काला एका मॅटर्निटी क्लिनिकबाहेर पाहिलं गेलं होतं. तेव्हापासून तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र यावर अद्याप अनुष्का किंवा विराट कोहलीने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. अनुष्का प्रेग्नंसीच्या दुसऱ्या तिमाहीत असून गरोदरपणाच्या अखेरच्या टप्प्यात ती याबद्दल जाहीर करेल, असंही म्हटलं जात आहे. वर्ल्ड कप 2023 साठी गुवाहाटीमध्ये वॉर्म-अप मॅचमध्ये व्यग्र असताना विराटला तातडीने मुंबईला यावं लागलं होतं. पर्सनल इमर्जन्सीचं कारण देत तो परतला होता. पत्नी अनुष्काला भेटण्यासाठी विराट गुवाहाटीहून मुंबईसाठी इमर्जन्सी फ्लाइटने आला होता.

अनुष्काने जानेवारी 2021 मध्ये मुलीला जन्म दिला. विराट आणि अनुष्काच्या मुलीचं नाव वामिका असं आहे. आता लवकरच त्यांच्या कुटुंबात आणखी एका पाहुण्याचं आगमन होणार आहे. यानिमित्ताने सोशल मीडियावर या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनुष्काच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, ती लवकरच ‘चकदा एक्स्प्रेस’ या बायोपिकमध्ये झुलन गोस्वामीची भूमिका साकारताना दिसणार आहे. दुसऱ्यांदा गरोदर होण्याआधीच या चित्रपटाची पूर्ण शूटिंग पार पडली होती. त्यानंतर आता अनुष्काने काही काळ ब्रेक घेतला आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.