मुंबई- ‘सदमा’ या चित्रपटातील कमल हासन आणि श्रीदेवी यांच्या अभिनयकौशल्याचं कौतुक करावं तेवढं कमी. या चित्रपटाला आणि त्यातील दोघांच्या कामगिरीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं होतं. कमल हासन आणि श्रीदेवी यांची ऑनस्क्रीन जोडीसुद्धा अनेकांना खूप आवडली होती. या जोडीला मिळत असलेलं प्रेम पाहून खऱ्या आयुष्यात त्यांनी लग्नबंधनाच अडकावं, अशी श्रीदेवी यांच्या आईची इच्छा होती.