AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Disha Patani House Firing: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांबद्दल सापडला महत्त्वाचा पुरावा, शूटर्स सीसीटीव्हीत कैद

Disha Patani House Firing: दिशाच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांना पकडण्यासाठी बरेली पोलिसांनी सहा पथकं तयार केली आहेत. 9 मिमी पिस्तूलचा वापर करून अनेक राऊंड फायरिंग केल्याचं पोलिसांना आढळून आलं आहे. दिशाची बहीण खुशबू तिच्या आईवडिलांसह आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह बरेलीतल्या घरात राहते, तर दिशा मुंबईत राहते.

Disha Patani House Firing: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांबद्दल सापडला महत्त्वाचा पुरावा, शूटर्स सीसीटीव्हीत कैद
दिशा पटानीच्या बरेलीतील घरावर गोळीबारImage Credit source: ANI
| Updated on: Sep 14, 2025 | 9:00 AM
Share

Disha Patani House Firing: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली इथल्या घराबाहेर शुक्रवारी सकाळी गोळीबार झाला. पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास सिव्हिल लाइन्स परिसरातील दिशाच्या घराबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेनंतर आरोपी नैनीताल महामार्गाच्या दिशेने पळून गेले. गोळीबाराची ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये हल्लेखोर ‘अपाचे’ बाईकवरून जात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. हल्लेखोरांपैकी बाईक चालवणाऱ्या तरुणाने हेल्मेट घातलं होतं. तर मागे बसलेल्या व्यक्तीने बाईकवरून खाली उतरून दिशाच्या घराच्या दिशेने गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. या गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील कुत्रे भुंकू लागले आणि त्यानंतर काही सेकंदातच दोघं आरोपी बाईकवरून पळाले. बरेली शहराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर कॅमेऱ्यांची तपासणी करून पोलिसांनी आरोपींचा पळून जाण्याचा मार्ग शोधून काढण्याची माहिती समोर येत आहे.

गोल्डी ब्रारच्या गँगने घेतली गोळाबाराची जबाबदारी

मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार करणारे दिल्ली-रामपूर महामार्गावरील झुमका तिरहा इथून शहरात घुसले. त्यानंतर ते मिनी बायपासमार्गे किला रोड मार्गे नैनीतालला पोहोचले. तिथून ते विल्याधामकडे जाताना दिसले. त्यानंतरचं त्यांचं लोकेशन कॅमेऱ्यात आढळलं नाही. जर आरोपी थेट महामार्गावरून पुढे गेले असते तर ते टोल प्लाझाच्या कॅमेऱ्यात कैद झाले असते, असं पोलिसांचं म्हणणं आहे. कुख्यात गुंड गोल्डी ब्रार गँगने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट करत या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे.

या गँगशी संबंधित असलेल्या रोहित गोदाराच्या आयडीवरून पोस्ट केलेल्या या पोस्टमध्ये म्हटलंय की, दिशाची बहीण खुशबू पटानीने स्वामी अनिरुद्धाचार्य आणि स्वामी प्रेमानंद यांच्याबद्दल केलेल्या कमेंटमुळे संतापल्याने गँगकडून हा गोळीबार करण्यात आला आहे. भविष्यात असं पुन्हा घडलं तर हत्येसारखी कारवाई केली जाई, अशी धमकीही या पोस्टमध्ये देण्यात आली होती. या घटनेत वापरलेले पिस्तूल परदेशी बनावटीचे असल्याचंही तपासात समोर आलं आहे. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत असून दिशाचे कुटुंबीय आणि त्यांच्या घराच्या आजूबाजूच्या लोकांची सुरक्षा वाढण्यात आली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.