‘दीया और बाती हम’ फेम अभिनेत्री आता नाही दिसणार चाहत्यांना, शेवटच्या पोस्टमध्ये म्हणाली, ‘तुम्हाला वाईट वाटेल पण…’

Diya Aur Baati Hum : 27 वर्षांच्या यशस्वी करियरनंतर 'दीया और बाती हम' फेम अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्री यापुढे चाहत्यांना दिसणार नाही, अभिनेत्रीची शेवटची पोस्ट वेदनादायक, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीचीच चर्चा

'दीया और बाती हम' फेम अभिनेत्री आता नाही दिसणार चाहत्यांना, शेवटच्या पोस्टमध्ये म्हणाली, 'तुम्हाला वाईट वाटेल पण...'
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 8:42 AM

Diya Aur Baati Hum : ‘दिया और बाती हम’ मालिकेने अनेक वर्ष चाहत्यांचं मनोरंजन केलं. मालिका संपली असली तरी, मालिकेतील कलाकार कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नुकताच, मालिकेतील एका अभिनेत्री सोशल मीडियावर शेवटची पोस्ट करत मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘दिया और बाती हम’ फेम अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री नूपुर अलंकार आहे. अभिनेत्रीने अभिनय सोडत आध्यात्मचा मार्ग स्वीकारला आहे. नूपुर अलंकार हिने संन्यास घेतला आहे.

नूपुर अलंकार हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना संन्यास घेत असल्याची माहिती दिली आहे. नूपुर अलंकार हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत..

नूपुर अलंकार हिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘शक्तिमान’, ‘घर की लक्ष्मी बेटियां’, ‘दिया और बाती हम’, ‘राजाजी और सावरिया’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये नूपुर अलंकार हिने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सध्या सर्वत्र नूपुर अलंकार हिची चर्चा रंगली आहे.

नूपुर अलंकार हिने 27 वर्षांचं यशस्वी करियर सोडून संन्यास घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे, ‘दिया और बाती हम’ मध्ये नुपूर अलंकार एका मारवाडी महिलेच्या भूमिकेत दिसली होती, जी सूरज आणि संध्या यांच्या नात्यातील अनेक वाद सोडवताना दिसली. मालिकेत नूपुर अलंकार फक्त 10 ते 11 एपिसोडमध्ये दिसली होती.

सांगायचं झालं तर, टीव्ही मालिका आणि सिनेमांमध्ये नवनवीन कलाकार दाखल होत आहेत. पण काही कलाकारांनी ग्लॅमरच्या दुनियेला अलविदा करून तपस्वी होण्याचा मार्ग स्वीकारला आहे. गेल्या वर्षी अनुपमा मालिकेतील नंदिनी म्हणजेच अभिनेत्री अनघा भोसले हिने तिचे अभिनय करिअर सोडून संन्यास स्वीकारला आहे. आता दिया और बाती हम फेम अभिनेत्री नुपूर अलंकार हिने संन्यासी बनण्याचा निर्णय घेतला आहे.

Non Stop LIVE Update
कीर्तिकर यांचा मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता, दरेकरांचा आरोप
कीर्तिकर यांचा मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता, दरेकरांचा आरोप.
भोंगळ कारभारावर ठाकरे गटाच बोट, मतदान संथ गतीनं का? अनिल देसाईंचा सवाल
भोंगळ कारभारावर ठाकरे गटाच बोट, मतदान संथ गतीनं का? अनिल देसाईंचा सवाल.
पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी
पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी.
अतिउत्साही कार्यकर्त्यांचा नादच खुळा, निकालापूर्वी झळकवले विजयाचे बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांचा नादच खुळा, निकालापूर्वी झळकवले विजयाचे बॅनर.
अग्रवाल कुटुंबाचा अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध, शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
अग्रवाल कुटुंबाचा अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध, शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप.
कीर्तिकरांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई, त्यांची.. कुणाची मागणी?
कीर्तिकरांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई, त्यांची.. कुणाची मागणी?.
बाल हक्क न्यायालयाचा निर्णय हा... पुणे अपघातावर अमृता फडणवीसांचा संताप
बाल हक्क न्यायालयाचा निर्णय हा... पुणे अपघातावर अमृता फडणवीसांचा संताप.
लोकसभा निवडणुका संपताच राज ठाकरे क्रिकेटच्या मैदानावर; टॉस उडवून...
लोकसभा निवडणुका संपताच राज ठाकरे क्रिकेटच्या मैदानावर; टॉस उडवून....
'तुमच्या व्यवस्थेने 2 जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा खाऊ घातला'
'तुमच्या व्यवस्थेने 2 जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा खाऊ घातला'.
मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्यात कधी होणार आगमन?
मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्यात कधी होणार आगमन?.