शक्ती कपूर होणार सासरे, कपूर कुटुंबात होणार ‘या’ खास व्यक्तीची एन्ट्री?

Shakti Kapoor | कपूर कुटुंबात आनंदाचं वातावरण, शक्ती कपूर होणार सासरी... कोणाची होणार कपूर कुटुंबात एन्ट्री? स्वगतासाठी जोरदार तयारी... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शक्ती कपूर यांच्या कुटुंबाची चर्चा...

शक्ती कपूर होणार सासरे, कपूर कुटुंबात होणार 'या' खास व्यक्तीची एन्ट्री?
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 7:48 AM

Shakti Kapoor | अभिनेते शक्ती कपूर आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसले तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. सध्या शक्ती कपूर यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. कपूर कुटुंबात एका खास व्यक्तीची एन्ट्री होणार आहे. शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा भाऊ सिद्धांत कपूर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. खुद्द सिद्धांत याने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सिद्धांत याने रिलेशनशीपवर कबुली दिली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शक्ती कपूर यांच्या लेकाच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

फोटोमध्ये सिद्धांत गर्लफ्रेंड अंतरा राजकुमारी हिच्यासोबत दिसत आहे. अंतरा हिच्यासोबत खास फोटो पोस्ट करत सिद्धांत याने कॅप्शनमध्ये, ‘जेव्हा फोटोग्राफर म्हणतो, एकमेकांकडे पाहून स्माईल करा…’ सिद्धांत याच्या पोस्टवर फक्त चाहत्यांनी नाही तर सेलिब्रिटींनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सांगायचं झालं तर, सिद्धांत याने लग्नाबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. पण अंतरा हिच्यासोबत असलेलं नातं सिद्धांत यांने कंफर्म केलं आहे. सिद्धांत यांने सर्वांसमोर नात्याची कबुली दिल्यानंतर शक्ती कपूर यांच्या कुटुंबात लवकरच नव्या व्यक्तीची एन्ट्री होईल असं देखील सांगण्यात येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिद्धांत याने पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

बहीण श्रद्धा कपूर हिच्याप्रमाणे सिद्धांत कपूर लाईमलाईटमध्ये नसतो. श्रद्धा देखील कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. दरम्यान श्रद्धा हिने देखील स्वतःचे काही फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘सुंदर दिसत आहे, लग्न करू का?’ असं लिहिलं होतं. ज्यामुळे श्रद्धा हिच्या देखील लग्नाच्या चर्चांनी जोर धरला होता.

श्रद्धा हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. श्रद्धा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.

ग्रँड एन्ट्री पडली महागात, नवरदेवाच्या फेट्याला लागली आग, पाहा VIDEO
ग्रँड एन्ट्री पडली महागात, नवरदेवाच्या फेट्याला लागली आग, पाहा VIDEO.
'मारकडवाडीत शरद पवार माझे काम...,' काय म्हणाले राम सातपुते
'मारकडवाडीत शरद पवार माझे काम...,' काय म्हणाले राम सातपुते.
'अजित पवार यांची १००० कोटीची संपत्ती ...,'काय म्हणाल्या अंजली दमानिया
'अजित पवार यांची १००० कोटीची संपत्ती ...,'काय म्हणाल्या अंजली दमानिया.
नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष पदी, उद्धवना खिजवण्याची तयारी
नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष पदी, उद्धवना खिजवण्याची तयारी.
'विरोधकांचा शपथविधीवर बहिष्कार म्हणजे....',काय म्हणाले प्रवीण दरेकर?
'विरोधकांचा शपथविधीवर बहिष्कार म्हणजे....',काय म्हणाले प्रवीण दरेकर?.
महाविकास आघाडीत पराभवाचे खापरफोडणे सरु, अबू आझमी यांचा अखेर आखरी सलाम
महाविकास आघाडीत पराभवाचे खापरफोडणे सरु, अबू आझमी यांचा अखेर आखरी सलाम.
राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले
राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले.
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?.
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?.
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी.