Dhurandhar : FA9LA गाण्यावर अक्षय खन्नाची एण्ट्री गाजली, ‘खोश फसलाह’ तुम्हीही गाऊ शकता, इतके सोपे आहेत लिरिक्स
Fa9la Song Lyrics Meaning : 'धुरंधर'मधल्या अक्षय खन्नाच्या FA9LA गाण्याचा अर्थ माहितीये का? खोश फसलाह' तुम्हीही गाऊ शकता, इतके सोपे आहेत लिरिक्स

Fa9la Song Lyrics Meaning : ‘छावा’ नंतर ‘धुरंधर’ सिनेमामुळे अभिनेता अक्षय कुमार चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेत आहे. FA9LA गाण्यात अक्षय याने ज्याप्रकारे एन्ट्री केली आहे, ते चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. अभिनेत्याचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एवढंच नाही तर, अनेकांनी व्हिडीओ तयार करत सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. अशात सध्या अक्षय कुमार याचा फिव्हर आहे… असं म्हणायला हरकत नाही…
FA9LA गाण्यात अक्षय खन्ना याला पाहिल्यानंतर, अभिनेत्याची तुलना बॉबी देओल याच्यासोबत होत आहे. कारण Animal सिनेमात Jamaal Kadu गाणं तुफान व्हायरल झालं. ज्यावर देखील अनेकांनी व्हिडीओ तयार केले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले. आचा सर्वत्र FA9LA या गाण्याची चर्चा रंगली आहे. FA9LAगाणं व्हायरल तर होत आहे पण गाण्याचे बोल आणि अर्थ कदाचित तुम्हाला माहिती नसेल…
गाण्याचे बोल आणि अर्थ…
या अखी दूस दूस इंदी खुश फासलाह – भाई नाचत राहा… नाचत राहा… मी मजेत आहे…
या अखी त्फुज त्फुज वल्लाह खुश रक्सह – माझ्या भावा तू कमाल करशील… खरंच हा डान्स कमाल आहे…
या अखी दूस दूस इंदी खुश फासलाह – माझ्या भावा, पूर्ण शक्ती लाव, पूर्ण शक्ती लाव… माझ्याकडे एक जबरदस्त बीट आहे…
या अखी त्फुज त्फुज वल्लाह खुश रक्सह – माझ्या भावा… तुझा सर्वत्र बोलबाला असू दे… खरंच हा डान्स कमाल आहे…
इंदी लक रक्सा कवीय्याह या अल – हबीब – माझ्या भावा माझ्याकडे तुझ्यासाठी मस्त डान्स आहे…
इस्मा सबुबा खातबाहा नासिब – याचं नाव सूबहा आहे… नियतीने याची निवड केली आहे…
मिद्द यिदक जहन्नक ब’ता’तीहा कफ्क – हात वर करा आणि तालावर थिरका…
गाण्याचे पूर्ण बोल…
या अखी दूस दूस इंदी खुश फासलाह
या अखी ट्फु ट्फुज वल्लाह खोश रक्साह
या अखी दूस दूस इंदी खुश फासलाह
या अखी ट्फु ट्फुज वल्लाह खोश रक्साह
इंदी लक रक्सा कवीय्याह या अल – हबीब
इस्मा सबुबा खातबाहा नासिब
मिद्द यिदक जहन्नक ब’ता’तीहा कफ्क
व – हज्ज जित्फिक हील खल्लद शदीद
अतिनी रक्सेत इल – फरीसाह
जीद अलैबा श्वे इंदी बिजाह
हक्क इल – मुहतर्र एल्ली न’रिफाह सैयदाह
आयल स्वेली रक्सा
बिया जिप ली वाहिक करत यल्ला
यबा तिग्ग सैय्यारा ब’इल – यस यल्ला
यल्ला स्वेरी रक्सा थानिया
रक्सेत इल – बत्रिक वल्ला 6 -8
या अखी डस डस इंदी खोश फसलाह
असे या गाण्याचे बोल आहेत… रिलीज झाल्यापासून, त्याचा अधिकृत व्हिडिओ YouTube वर 7 मिलियन व्ह्यूज ओलांडला आहे, तर सिनेमातील दृश्यांच्या क्लिप्स इंस्टाग्रामवर लाखो वेळा शेअर केल्या जात आहेत. अक्षय खन्ना याच्या डान्स देखील कौतुक होत आहे. अक्षय खन्नाने स्वतःच डान्स ठरवला आणि केला… जो आता सर्वांच्या पसंतीस उतरला आहे.
