AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra- Sunny Deol : धर्मेंद्र यांच्या मोठ्या लेकाचं खरं नाव माहित्ये ? सनी नव्हे, या नावाने ओळखला जातो सुपरस्टार

सुपरस्टार्सपैकी एक मानल्या गेलेल्या सनी देओल याचं खरं नाव हे नव्हतंच, हे तुम्हाला माहीत आहे का ? धर्मेंद्र यांच्या सर्वात मोठ्या, लाडक्या लेकाचं खरं नाव वेगळचं असून चित्रपटसृष्टीत येताना त्याने वेगळं नाव धारण केलं. काय आहे त्याचं खरं नाव ?

Dharmendra- Sunny Deol : धर्मेंद्र यांच्या मोठ्या लेकाचं खरं नाव माहित्ये ? सनी नव्हे, या नावाने ओळखला जातो सुपरस्टार
सनी देओलचं खरं नाव काय ?Image Credit source: social media
| Updated on: Dec 04, 2025 | 10:28 AM
Share

दमदार संवाद, भारीभक्कम ॲक्शन आणि देसी ॲटीट्यूड यासाठी देओल फॅमिली फेमस आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं नुकतचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं. ही मॅन म्हणून तर ते प्रसिद्ध होते, पण त्यांचा वारसा पुढे चालवत त्यांचा लाडका मोठा मुलगा सनी देओलनेही सर्वांच्या हृदयावर राज्य केलं. दमदार अभिनय आणि ॲक्शन सीक्वेन्स यामुळे सनीचा चित्रपट पाहणारे प्रेक्षक थिएटरमध्ये टाळ्या- शिट्ट्यांची बरसात करतात.

सुपरस्टार्सपैकी एक मानल्या गेलेल्या सनी देओल याचं खरं नाव हे नव्हतंच, हे तुम्हाला माहीत आहे का ? धर्मेंद्र यांच्या सर्वात मोठ्या, लाडक्या लेकाचं खरं नाव वेगळचं असून चित्रपटसृष्टीत येताना त्याने वेगळं नाव धारण केलं. सर्वांना सनी या नावाने माहित असलेल्या या अभिनेत्याचं खर नाव आहे अजय सिंग देओल. जन्मावळी त्याचं हेच नाव पिता धर्मेंद्र यांनी ठेवलं होतं, पण हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकण्यापूर्वी त्याने अजय सिंह देओल हे नाव बदलून ‘सनी देओल’ हे नाव घेतलं, कारण सनी हेच त्याचं लहानपणापासूनच टोपणनाव होते. स्क्रीनवर हे ऐकताना जास्त कॅची वाटतं, या विचाराने आधीचं नाव बदलून त्याने हे नाव धारण केलं.

सनी देओलच्या कुटुंबात कोण कोण ?

सनी देओल हा एका अशा कुटुंबातून येतो जिथे चित्रपट हे केवळ करिअर नसून एक वारसा आहे. त्याचे वडील धर्मेंद्र हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिष्ठित सुपरस्टार होते. त्याची आई प्रकाश कौर लाईमलाइटपासून दूर असली तरी ती कुटुंबाचा कणा आहे. लहान भाऊ बॉबी देओल याने बॉलिवूडसह ओटीटी प्लॅटफॉर्मवरही नवी ओळख मिळवली. त्यांना दोन बहिणी असून त्या परदेशात असतात. तर सावत्र आई हेमा मालिनी याही प्रसिद्ध अभिनेत्री असून ईशा आणि आहना अशा दोन सावत्र बहिणी आहेत. याचा अर्थ देओल कुटुंब पूर्णपणे स्टार पॉवरने भरलेले आहे.

सनी देओलच्या चित्रपटांचे विक्रम

1983 साली सनी देओलने बेताब या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि त्याच्या पहिल्याच चित्रपटात त्याने आपला करिश्मा दाखवला. त्यानंतर त्याचे करिअर अनेक सुपरहिट चित्रपटांनी भरलेले होते.घायल, बॉर्डर, घातक, दामिनी, आणि गदर यासारख्या एकाहून एक चित्रपटांमुळे त्याला ॲक्शन हिरोचा दर्जा मिळाला. ‘ये ढाई किलो का हाथा’ हा त्याचा गाजलेला संवाद चाहत्यांच्या आजही लक्षात आहे. त्याचा प्रामाणिक अभिनय आणि खऱ्या भावना त्याला नेहमीच इतर स्टार्सपेक्षा वेगळं बनवतात.

अफेअरही चर्चेत

सनी देओलचे वैयक्तिक आयुष्य हेदेखील त्याच्या चित्रपटांइतकेच चर्चेचा विषय राहिले आहे. विशेषतः डिंपल कपाडियासोबतचे त्याचे नाते बॉलीवूडमधील सर्वात व्हायरल आणि रहस्यमय कथांपैकी एक मानले जाते. दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं, त्यांच्या केमिस्ट्रीबद्दल आजही चर्चा केली जाते. पण सनीने त्याचं पर्सनल लाईफ नेहमीत प्रायव्हेट ठेवण्याचा प्रयत्न केला.

2026 मधले आगामी चित्रपट

गदर 2 ला मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर सनी दओल त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल खूप चर्चेत आहे. जानेवारीमध्ये त्याचा बॉर्डर 2 रिलीज होणार आहे. त्यामध्ये दिलजीत दोसांझ, वरुण धवन, अहान शेट्टी आणि सोनम बाजवा सरखे अनेक मोठे कलाकार दिसतील. तर मार्च 2026 मध्ये त्याचा गबरू हा चित्रपट मोठ्या पडद्यावर दिसेल. त्याला मोट्या स्क्रीनवर पुन्हा पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.