‘फाटकी नोट मना घ्यावाची नाय…’ हे गाणं कुणी लिहिलं? कुठे सूचलं माहीत आहे का?

'फाटकी नोट मना घ्यावाची नाय...' तिसऱ्या पिढीतही हे कोळीगीत तितकंच प्रसिद्ध आहे. (do you know which is the first koli song?)

'फाटकी नोट मना घ्यावाची नाय...' हे गाणं कुणी लिहिलं? कुठे सूचलं माहीत आहे का?
kundan kamble
भीमराव गवळी

|

Apr 16, 2021 | 5:49 PM

मुंबई: ‘फाटकी नोट मना घ्यावाची नाय…’ तिसऱ्या पिढीतही हे कोळीगीत तितकंच प्रसिद्ध आहे. 60च्या दशकात आलेल्या या कोळीगीताने एकच धुमाकूळ घातला. त्यावेळी लोकप्रियतेचे अनेक विक्रम या गीताने मोडले. पहिल्या कोळी गीताची मुहूर्तमेढही याच गीताने रोवली गेली. दिवंगत लोकशाहीर कुंदन कांबळे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून हे लोकगीत उतरलं होतं. आजही या गीताचा गोडवा कमी झालेला नाही. (do you know which is the first koli song?)

पहिलं कोळीगीत

विठ्ठल उमप यांनी खऱ्या अर्थाने कोळीगीतांची मुहुर्तमेढ रोवली. 1962 मध्ये गीतकार, कवी, शाहीर, दिवंगत कुंदन कांबळे यांनी ‘फाटकी नोट मना घ्यावाची नाय, धंद्यात खोट मना खावाची नाय’ हे गीत लिहिलं. हे गाणं विठ्ठल दादांनी गायलं आणि ते तुफान गाजलं. आजही हे गाणं तितकंच लोकप्रिय आहेत. गाण्याचे शब्द, संगीत आणि विठ्ठलदादांच्या लाजवाब आवाजाने हे गाणं मराठी माणसाच्या मनावर आजही गारूड करून आहे. एवढेच नव्हे तर 19962 मध्ये आलेल्या या गाण्याची विठ्ठलदादांना अखेरपर्यंत रॉयल्टी मिळत होती. यावरून या गाण्याची लोकप्रियता दिसून येते.

मासळी बाजारात गेले आणि…

या गाण्याचा किस्साही वेगळाच आहे. शाहीर कुंदन कांबळे हे एकदा मासळी बाजारात गेले होते. तिथला गजबाजाट, म्हावरं विकताना मासळी विक्रेत्या मावश्यांचा कोळीबोलीतून चाललेला संवाद, कुंदनदादांच्या कानावर आला. हे सर्व वातावरण पाहून त्यांना गाणं सूचलं नसतं तर ते कुंदनदादा कसले? हे वातावरण पाहून त्यांना ‘फाटकी नोट…’ सूचलं आणि महाराष्ट्राला पहिलं कोळीगीत मिळालं.

कोण होते कुंदन कांबळे?

लोकशाहीर कुंदन कांबळे हे गायक आणि गीतकार होते. त्यांच्या कविताही अव्वल दर्जाच्या होत्या. त्यांनी लोकगीतं, कोळीगीतं, आंबेडकरी गीतं, अखंड, अभंग, कविता, बालकविता, भारूड, गणगवळण, पोवाडा आदी गीतांचे सर्व प्रकार हाताळले. इतकेच नाही तर हायकू, वात्रटिका, पात्रटिका यांना पर्याय म्हणून त्यांनी शोकांतिका हा एक नवा काव्यप्रकार सुरू केला. प्रत्येक कविसंमेलनात कविता सादर करण्यापूर्वी ते काही शोकांतिका वाचायचे. काहीसा वात्रटिका सारखाच हा प्रकार होता. त्यांनी आपल्या परिने नेटाने हा प्रकार रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आयुष्याचा बराचसा काळ मुंबई सेंट्रल आणि भायखळ्याच्या मध्ये असलेल्या दगड चाळीत गेला. त्यांचा जन्मही याच दगडचाळीत झाला. या दगडचाळीत स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे, तुकाराम शिशूपाल. शंकर कांबळे, नालवादक नारायण शिंदे, मुनेश्वर धाबार्डे, गणेश खरात. गणपत गायकवाड, कवी अर्जुन रोकडे, रंजन रोकडे, भजनी मंडळातील बुवा देठे, काशिनाथ देठे, रमेश साळवे आणि खरात मास्तर आदी कलावंत राहायचे. त्यामुळे गाण्याचं वातावरणच या चाळीत होते. या दगडचाळीत आंबेडकरी जनतेच मोठा बोलबाला होता. गाण्याचे अनेक कार्यक्रम त्यांनी याच दगड चाळीत केले. त्यामुळे मनाच्या कोपऱ्यात बसलेल्या या दगडचाळीवर त्यांनी एक गाणंही लिहिलं होतं.

दगडचाळ माझी, दगडचाळ माझी,
कवी गायकांची दगडचाळ माझी…
चहा कुणी देई, कुणी देई पानं,
बोलावून प्रल्हादा गा म्हणती गाणं,
डबड्याचा ठेका अन् गळ्यातील तानं,
चाळ वेडी झाली त्या मंजुळ सूरानं,
रसिक रंजन सेवा हीच रोजीरोटी…

कुंदन कांबळे यांनी हे गाणं लिहिल्यानंतर प्रल्हाद शिंदेंना गाऊन दाखवलं होतं. हे गाणं ऐकल्यानंतर जुन्या आठवणी जाग्या झाल्याने प्रल्हाद शिंदेंच्या डोळ्यात टचकन पाणी आलं होतं. दगडचाळीचा संपूर्ण पिक्चरच त्यांच्या डोळ्यासमोर तरारळला होता. विशेष म्हणजे या दगडचाळीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श लागला होता, हे कुंदनदादा अभिमानाने सांगत.

गाण्याचं वैशिष्ट्ये काय?

कुंदन कांबळे यांनी चारूसूत या टोपण नावाने संगीत दिलं आहे. शाश्वत विचारांवर गाणं लिहिणं हे त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्ये आहे. आपलं गाणं चिरकाल टिकलं पाहिजे, यावर त्यांचा भर असतो. क्वचितच त्यांनी प्रासंगिक गीते लिहिले आहेत. तसेच 1998 ते 2000 पर्यंत परळच्या भोईवाड्यातील महात्मा फुले तांत्रिक विद्यालयात उठाव साहित्य मंचाचे कविसंमेलन व्हायचे. कवी विवेक मोरे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम व्हायचा. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी हे कविसंमेलन व्हायचे. त्यावेळी कुंदनदादा प्रत्येक कार्यक्रमात नवीनच कविता सादर करायचे. प्रत्येकाने प्रत्येकवेळी नवी कविता सादर करावी असा त्यांचा आग्रह असायचा. त्याच त्याच कविता वारंवार ऐकवणे त्यांना पटत नसायचे.  (साभार, आंबेडकरी कलावंत) (do you know which is the first koli song?)

संबंधित बातम्या:

गाणं गायल्यावरच भीक मिळायची, नंतर अख्ख्या देशाला आपल्या गाण्याने वेड लावलं; वाचा, ‘या’ गायकाचा किस्सा!

स्टेजवर गाता गाताच बोदडेंना पॅरेलिसिसचा अ‍ॅटॅक आला, ग्रामस्थांकडून पै पै जमा; वाचा, पुढे काय घडलं?

गाणं ऐकता ऐकता ‘त्याने’ संपूर्ण पगारच प्रतापसिंग बोदडेंवर उधळला, नंतर काय झालं?, गाणं कोणतं होतं?; वाचाच!

(do you know which is the first koli song?)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें