माझी ऐश्वर्यासोबत तुलना करु नका, करीना कपूर का संतापली

करिना कपूर आणि ऐश्वर्या राय यांच्यात चांगले संबंध नाहीत हे अनेकदा समोर आले आहे. दोघेही अनेकदा समोरासमोर आले की एकमेकांकडे दुर्लक्ष करताना दिसले आहेत. ऐश्वर्याबाबत करिना कपूरने केलेले एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. ऐश्वार्याने देखील याआधी करिनाला टोमणा मारला आहे.

माझी ऐश्वर्यासोबत तुलना करु नका, करीना कपूर का संतापली
Follow us
| Updated on: Jun 17, 2024 | 9:00 PM

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय यांच्यात जमत नसल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं जातं. करीना कपूर आणि ऐश्वर्या राय एकमेकांसोबत जास्त बोलताना ही कधी दिसल्या नाहीत. याशिवाय अनेक प्रसंगी दोघेही एकमेकांना टोमणे मारताना दिसतात. करीना कपूर खानने दावा केला आहे की, ‘हम दिल चुके सनम’ या चित्रपटात तिला मुख्य अभिनेत्री म्हणून कास्ट करण्यात येणार होते. ऐश्वर्या राय नव्हे तर निर्मात्यांची ती पहिली पसंती होती. पण त्या भूमिकेसाठी ती खूपच लहान होती. त्यामुळे तिने स्वतः हा चित्रपट करण्यास नकार दिला. या वक्तव्यानंतर ऐश्वर्या रायला देखील राग आला होता.

करिनाने ऐश्वर्याची जागा घेतली होती

ऐश्वर्या रायला ‘हिरोईन’ या चित्रपटासाठी कास्ट करायचे होते पण काही कारणास्तव हा चित्रपट करीना कपूरकडे गेला. ऐश्वर्याची जागा घेतल्यानंतर करिनाने सांगितले होते की, हिरोईन हा चित्रपट तिच्यासाठी बनवला गेला होता आणि त्यामुळे तिला या चित्रपटाची मुख्य नायिका बनवावी लागली. तिचा हा चित्रपट आहे.

‘माझी आणि ऐश्वर्या रायची तुलना करू नका’

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘हिरोईन’ चित्रपटाच्या वेळी ऐश्वर्या राय ही प्रेग्नंट होती. त्यामुळे तिने हा चित्रपट सोडला होता. त्यानंतर निर्मात्यांनी करीना कपूरला या चित्रपटासाठी साइन केले. ऐश्वर्या रायसोबत तुलना केल्यावर करीना कपूर खूप संतापली आणि म्हणाली की, माझी आणि ऐश्वर्या रायची तुलना करू नका. आम्ही दोघे वेगवेगळ्या पिढ्यांचे आहोत. मी तिच्यापेक्षा लहान आहे.

बॉलीवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरने ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये ऐश्वर्या रायला एक प्रश्न विचारला गेला होते की, जर तुम्ही पार्टी होस्ट केली तर तुम्ही कोणाला आमंत्रित करणार नाही? यावर ऐश्वर्या रायने लगेचच उत्तर दिले होते की,  जो तुमच्या पार्टीमध्ये नेहमी उपस्थित असतो. या उत्तरानने ऐश्वर्या रायने करीना कपूरला टोमणा मारला होता. कारण इंडस्ट्रीतील प्रत्येक व्यक्तीला माहित आहे की करीना कपूर आणि करण जोहर हे दोघ खास मित्र आहेत आणि करण जोहरच्या प्रत्येक पार्टीत करीना कपूर नेहमीच हजर असते.

करीना कपूरला ‘रिफ्युजी’ चित्रपटासाठी फेस ऑफ द इयरचा पुरस्कार दिला जात असताना एक धक्कादायक घटना सगळ्यांनी पाहिली होती. करीना कपूरला हा पुरस्कार देण्यासाठी ऐश्वर्या रायला मंचावर बोलावण्यात आले होते. त्यावेळी करीना कपूर वेगळ्याच अॅटिट्युडमध्ये स्टेजवर पोहोचली होती आणि तिने ऐश्वर्या रायच्या हातातून माईक हिसकावून घेतला होता.

Non Stop LIVE Update
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय.
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य.
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका.
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’.
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?.
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली झलक
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली झलक.
जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, 'या' क्षेत्राला बसला मोठा फटका
जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, 'या' क्षेत्राला बसला मोठा फटका.
संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यास आलेल्या महिलांचा खोळंबा
संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यास आलेल्या महिलांचा खोळंबा.
महायुतीचे काळे कारनामे..., पवार गटाचं निदर्शन, काळे फुगे लावून डिवचलं
महायुतीचे काळे कारनामे..., पवार गटाचं निदर्शन, काळे फुगे लावून डिवचलं.