Drishyam 2: अवघ्या 3 दिवसांत ‘दृश्यम 2’ने भरून काढला बजेट; पहिल्या वीकेंडला तुफान कमाई

बॉक्स ऑफिसवर 'दृश्यम 2'ची त्सुनामी; 3 दिवसांत बजेट पार कमाई

Drishyam 2: अवघ्या 3 दिवसांत 'दृश्यम 2'ने भरून काढला बजेट; पहिल्या वीकेंडला तुफान कमाई
Drishyam 2: अवघ्या 3 दिवसांत 'दृश्यम 2'ने भरून काढला बजेटImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 21, 2022 | 8:33 AM

मुंबई: गेल्या शुक्रवारी अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन आणि अक्षय खन्ना यांच्या भूमिका असलेला ‘दृश्यम 2’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाच्या कमाईने बजेटचा खर्च भरून काढला आहे. बॉक्स ऑफिसवर जणू ‘दृश्यम 2’ची त्सुनामीच आली आहे. प्रेक्षक-समिक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने पहिल्याच वीकेंडला थिएटर्समध्ये तुफान गर्दी पहायला मिळाली. या चित्रपटाने तीन दिवसांत किती कोटी रुपये कमावले, ते पाहुयात..

दृश्यम 2 ने पहिल्याच दिवशी 15.38 कोटी रुपयांची कमाई केली होती. अजय देवगणचा हा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’नंतर सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 21.59 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. पहिल्या दोन दिवसांची कमाई ही 36 कोटींपेक्षा जास्त झाली. तर तिसऱ्या दिवशी कमाईच्या आकड्यात आणखी वाढ पहायला मिळाली.

हे सुद्धा वाचा

दृश्यम 2 ने तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी जवळपास 26.70 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे या चित्रपटाची पहिल्या वीकेंडची कमाई ही 63 कोटींच्या घरात पोहोचली आहे. पहिला वीकेंड हा प्रत्येक चित्रपटासाठी महत्त्वाचा असतो. या पहिल्या वीकेंडच्या परीक्षेत दृश्यम 2 ने अव्वल कामगिरी केली आहे.

2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. दृश्यम याच नावाने प्रदर्शित झालेल्या मल्याळम चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. मल्याळम भाषेतही हा चित्रपट हिट ठरला होता. अजय देवगणचा या वर्षातील हा तिसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेले ‘रनवे 34’ आणि ‘थँक गॉड’ हे दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले होते.

अभिनेत्री तब्बूने या वर्षात दोन चित्रपट केले. ‘भुल भुलैय्या 2’ आणि ‘दृश्यम 2’ हे तिचे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही तब्बूचं स्टारडम कायम असल्याचं कौतुक नेटकरी करत आहेत.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.