AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drishyam 3: ‘दृश्यम 3’ मोडणार ‘या’ 4 सिनेमांचा रेकॉर्ड, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिस पैशांचा पाऊस

Drishyam 3 Box Office Collection Day 1: अभिनेता अजय देवगण स्टारर 'दृश्यम' सिनेमा मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्या 'दृश्यम' सिनेमावर आधारित आहे.. ज्याचा तिसरा पार्ट आता प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पडला आहे.

Drishyam 3: 'दृश्यम 3' मोडणार 'या' 4 सिनेमांचा रेकॉर्ड, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिस पैशांचा पाऊस
Drishyam 3
| Updated on: May 22, 2026 | 10:07 AM
Share

Drishyam 3 Box Office Collection Day 1: मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांनी नुकताच 66 वा वाढदिवस साजरा केला. हेच निमित्त साधत ‘दृश्यम 3’ सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. पहिल्याच दिवशी सिनेमाने बक्कळ कमाई करत, 2026 मध्ये सर्वाधिक कमाई केलेल्या सिनेमांच्या यादीत एन्ट्री केली आहे. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पडला आता शनिवार आणि रविवार असल्यामुळे सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल पाहणं महत्त्वाच ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिनेमाचं बजेट 100 कोटी रुपये आहे. तर सिनेमा पहिल्यात आठवड्यात 100 कोटींचा गल्ला ओलांडेल असं देखील सांगण्यात येत आहे.

‘दृश्यम 3’ सिनेमाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन

बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, मोहनलाल स्टारर ‘दृश्यम 3’ ने भारतात पहिल्याच दिवशी 15.85 निव्वळ कमाई केली आहे. भारतातील एकूण कमाई 18.37 कोटी झाली आहे. जगभरातील एकूण कमाई 43.37 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

2026 मधील पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारे 5 सिनेमे

IMdb नुसार, भारतात पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सिनेमाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ‘धुरंधर द रिवेंज’ सिनेमा आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी 205.2 कोटी रुपयांचा गल्ला जमा केली. दुसऱ्या क्रमांकावर प्रभास स्टारर ‘द राजा सहाब’ सिनेमा आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी 100.6 कोटी रुपयांची कमाई केली. तिसऱ्या क्रमांकावर ‘मन शंकरा वारा प्रसाद गारू ‘ सिनेमा असून त्याने 71.2 कोटींपर्यंत मजल मारली. चौथ्या क्रमांकावर ‘उस्ताद भगत सिंह’ सिनेमा आहे, सिनेमाने पहिल्याच दिवशी 48.2 कोटी रुपये कमावले. तर पाचव्या क्रमांकावर ‘दृश्यम 3’ सिनेमा आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी 43 कोटींची कमाई केली आहे. आता ‘दृश्यम 3’ सिनेमा या चार सिनेमांपैकी कोणत्या सिनेमाला मागे टाकतो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘दृश्यम 3’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, ‘दृश्यम 3’ सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक जीतू जोसेफ यांच्या खांद्यावर होती. ‘दृश्यम 3’ 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम 2’ सिनेमाचा सिक्वल आहे… ‘ दृश्यम 3’ सिनेमाला प्रेक्षकांकडून प्रेम मिळत आहे. सिनेमात मोहनलाल यांच्यासोबतच मीना, अंसिबा हसन, एस्थर अनिल, मुरली गोपी, सिद्दीकी आणि आशा शरथ यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहे.

Follow Us
प्रताप सरनाईकांसह ओमराजे निंबाळकर... 6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा...
प्रताप सरनाईकांसह ओमराजे... 6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका फोटोत चक्क...
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले.
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले...
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारण
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर