AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मीच कॅबिनेट..”; कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’चा आणखी एक दमदार ट्रेलर

कंगना राणौत यांची मुख्य भूमिका असलेल्या 'इमर्जन्सी' या चित्रपटाचा आणखी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. येत्या 17 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये कंगनासोबतही अनुपम खेर, श्रेयस तळपदे, विशाक नायर, मिलिंद सोमण, महिमा चौधरी यांच्याही भूमिका आहेत.

मीच कॅबिनेट..; कंगना राणौत यांच्या 'इमर्जन्सी'चा आणखी एक दमदार ट्रेलर
इमर्जन्सी या चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृश्येImage Credit source: Youtube
| Updated on: Jan 06, 2025 | 1:32 PM
Share

अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अनेक अडथळ्यांना पार करत अखेर येत्या 17 जानेवारी रोजी हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाचा आणखी एक ट्रेलर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. जवळपास दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये चित्रपटातील अनेक दमदार भूमिकांची झलक पहायला मिळते. अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, विशाक नायर यांसारखे कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. ‘इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया’ ही घोषणा पुन्हा एकदा या ट्रेलरमध्ये ऐकायला मिळते.

या चित्रपटात अनुपम खेर हे जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारत असून त्यांच्या दृश्याने ट्रेलरची सुरुवात होते. इंदिरा गांधी यांना पत्र लिहून तते आठवण करून देत आहेत की पंतप्रधानपदाची खुर्ची आता फक्त एका सिंहासनासारखी नाही, तर डरकाळी फोडणाऱ्या सिंहासारखी आहे, ज्याची गर्जना जगभरात गुंजेल. देशाच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासात महत्त्वाचा भाग असलेल्या आणीबाणीची घोषणा करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाशी या दृश्याचा संबंध आहे. क्रूरता, हिंसाचार आणि लोकशाहीची हत्या.. हे सर्व या ट्रेलरमध्ये पहायला मिळतंय.

देशाच्या इतिहासातील सर्वांत प्रतिष्ठित आणि वादग्रस्त नेत्या इंदिरा गांधी यांच्या भूमिकेतील कंगना यांनी ट्रेलरमध्ये प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलंय. “मीच कॅबिनेट आहे” असं ठरवणाऱ्या इंदिरा गांधी यांचे विविध राजकीय डावपेच, त्याचे परिणाम या सर्व गोष्टींवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. 1966 मध्ये इंदिरा गांधी यांनी पदभार स्वीकारल्यापासून 1971 च्या पाकिस्तानसोबतच्या युद्धात, आणीबाणीच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय, मूलभूत अधिकारांवर आणलेली गदा या सर्वांची झलक ट्रेलरमध्ये पहायला मिळते

ट्रेलरमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत श्रेयस तळपदे, फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत मिलिंद सोमण आणि संजय गांधी यांच्या भूमिकेत विशाक नायर हे चपखल दिसून येतात. ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शक कंगना यांनीच केलं आहे. तर रितेश शाह हे या चित्रपटाचे पटकथाकार आहेत. यामध्ये महिमा चौधरी आणि सतिश कौशिक यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.