Top 5 News | पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला जामीन नाहीच ते नेटकऱ्यांकडून मिस्टर परफेक्शनिस्ट ट्रोल, वाचा मनोरंजन विश्वातील घडामोडी

जर तुम्ही बुधवार म्हणजेच 12 ऑगस्ट 2021च्या मनोरंजन विश्वाशी संबंधित बातम्या चुकवल्या असतील, तर तुम्ही त्या मनोरंजन टॉप 5 मध्ये वाचू शकता.

Top 5 News | पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला जामीन नाहीच ते नेटकऱ्यांकडून मिस्टर परफेक्शनिस्ट ट्रोल, वाचा मनोरंजन विश्वातील घडामोडी
Top 5 News

मुंबई : दररोज मनोरंजन विश्वात काही छोट्या-मोठ्या बातम्या चर्चेत असतातच. चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सशी संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. मनोरंजन विश्वातील बातम्यांच्या दृष्टीनेही बुधवार खूप महत्त्वाचा होता. मात्र, जर तुम्ही बुधवार म्हणजेच 12 ऑगस्ट 2021च्या मनोरंजन विश्वाशी संबंधित बातम्या चुकवल्या असतील, तर तुम्ही त्या मनोरंजन टॉप 5 मध्ये वाचू शकता.

पॉर्नोग्राफी प्रकरणी शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला जामीन नाहीच!

व्यवसायिक राज कुंद्राच्या (Raj Kundra) तुरुंगवासाची मुदत मंगळवारी सत्र न्यायालयाने वाढवली आहे. अश्लील सामग्रीची निर्मिती आणि अपलोड केल्याच्या आरोपावरून त्यांच्या जामिनाची सुनावणी आता 20 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे (Actress Shilpa Shetty) पती 19 जुलैपासून कोठडीत आहेत. त्यांची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंगळवारी संपली, मात्र, गुन्हे शाखेनं 19 कारणं देत त्याला विरोध केला त्यामुळे आता न्यायालयानं ही सुनावणी पुढे ढकलली आहे.

‘मित्रांनो कसा वाटला नवा सेट?’ म्हणत कपिल शर्मानं शेअर केले खास फोटो

कपिल शर्माने ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवरून नवीन फोटो शेअर केले आहेत. कॉमेडियन-टीव्ही होस्ट-अभिनेता कृष्णा अभिषेक, किकू शारदा, भारती सिंह, अर्चना पूरन सिंह आणि इतरांसह कॉमेडी शोच्या आणखी एका सीझनसोबत परत येणार आहे. मंगळवारी, कपिल शर्माने इन्स्टाग्रामवर नवीन सेट दाखवणारे फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये ’10-स्टार ‘किराणा दुकान,’ हॉटेल चिल पॅलेस ‘आणि’ बँक ऑफ बगोदा ‘चे एटीएम वेस्टिबुल आहे. ‘हॉटेल’च्या शेजारी लाईव्ह बँडसाठी एक छोटा सेट-अप तयार करण्यात आला आहे. हे नवीन फोटो कपिलच्या मित्र परिवाराला आणि चाहत्यांचा प्रचंड आवडले आहेत.

‘जहांगीर’ च्या नावावरुन ट्रोल करणाऱ्यांवर स्वरा भास्करने साधला निशाणा

बॉलिवूडची अभिनेत्री करीना कपूर खान(Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान(Saif Ali Khan)च्या मुलाचे नाव जहांगीर ठेवण्यात आले आहे. आता या नावाबाबत सोशल मीडियावर चर्चा तीव्र रंगली आहे. हे नाव समोर आल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्ते या जोडीला ट्रोल करत आहेत आणि त्यांच्यावर टीका करत आहेत. युजर्स सवाल करीत आहेत की करीनाने तिच्या मोठ्या मुलाचे नाव तैमूर ठेवले आहे, त्यानंतर तिने तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर कोणत्या कारणाने ठेवले आहे. अशा परिस्थितीत, आता हे संपूर्ण प्रकरण पाहता, करीना कपूर खानची जुनी मैत्रीण आणि कोस्टार प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर(Swara Bhasker)ने यावर आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

नेटकऱ्यांकडून मिस्टर परफेक्शनिस्ट ट्रोल

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटलं जाणारा अभिनेता आमिर (Aamir Khan) त्याच्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ (Lal Singh Chaddha) या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेले काही दिवस काश्मीरमध्ये (Kashmir) होता. आता आमिर शूटिंग संपवून मुंबईला परतला यादरम्यान  किरण राव (Kiran Rao) आणि मुलगा आझाद विमान तळावर पोहोचले होते. ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं. एवढंच नाही तर या तिघांनी पापराझींना एकत्र उभं राहत पोजही दिल्या, महत्त्वाचं म्हणजे तिघंही यावेळी हॅपी फॅमिलीसारखे एकत्र दिसत होते. या दरम्यान, आमिर खान लाइम यलो कलरच्या हूडी आणि लोअरमध्ये दिसला. त्याचवेळी किरण राउंड नेक स्ट्राईप टी-शर्ट आणि बॅगी जीन्समध्ये दिसली.

गौरीच्या पहिल्या मंगळागौरीत येणार का विघ्न?

श्रावण महिना आला की चाहूल लागते ती सणांची. श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. मंगळागौरीच्या सणाचा जल्लोष स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की असतं’ मालिकेतही पाहायला मिळणार आहे. गौरीची पहिलीच मंगळागौर असल्यामुळे साग्रसंगीत पूजा पार पडणार आहे. नऊवारी साडी, पारंपरिक दागिने असा शिर्केपाटील कुटुंबातील सर्वच स्त्रियांचा थाट विशेष लक्ष वेधणार आहे. लाडक्या सुनेसाठी माई म्हणजेच नंदिनी शिर्केपाटील यांनी देखिल मंगळागौरीच्या खेळामध्ये सहभाग घेतला आहे. एकीकडे उत्साहाचं वातावरण असताना जयदीपच्या अटकेने मात्र आनंदाला गालबोट लागणार आहे. मंगळागौरीची पूजा सुरु असतानाच जयदीपला अटक करण्यासाठी पोलीस दाखल होतात.

हेही वाचा :

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचा 300 एपिसोड्सचा टप्पा पूर्ण, प्रोमो शेअर करत मानले प्रेक्षकांचे आभार

‘शुक्रिया’ ते ‘पोस्ट कामगार’… साजन शिंदेंच्या माहीत नसलेल्या ‘या’ गोष्टी वाचाच

Published On - 10:27 am, Thu, 12 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI