Aamir Khan : नेटकऱ्यांकडून मिस्टर परफेक्शनिस्ट ट्रोल; म्हणाले, ‘ तुम्ही विभक्त झालात मग सोबत कशाला?’

तुम्हाला एकत्र राहायचं होतं मग घटस्फोट का? आणि तुमचा घटस्फोट झाला आहे, तर एकत्र सुट्टी घालवण्यासाठी जाण्यात काय अर्थ आहे? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत. (Netizens trolled Mr Perfectionist, saying, "Aamir Khan and Kiran Rao are separated, so why are they together?")

Aamir Khan : नेटकऱ्यांकडून मिस्टर परफेक्शनिस्ट ट्रोल; म्हणाले, ' तुम्ही विभक्त झालात मग सोबत कशाला?'
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 7:36 AM

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटलं जाणारा अभिनेता आमिर (Aamir Khan) त्याच्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ (Lal Singh Chaddha) या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेले काही दिवस काश्मीरमध्ये (Kashmir) होता. आता आमिर शूटिंग संपवून मुंबईला परतला यादरम्यान  किरण राव (Kiran Rao) आणि मुलगा आझाद विमान तळावर पोहोचले होते.

ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं. एवढंच नाही तर या तिघांनी पापराझींना एकत्र उभं राहत पोजही दिल्या, महत्त्वाचं म्हणजे तिघंही यावेळी हॅपी फॅमिलीसारखे एकत्र दिसत होते. या दरम्यान, आमिर खान लाइम यलो कलरच्या हूडी आणि लोअरमध्ये दिसला. त्याचवेळी किरण राउंड नेक स्ट्राईप टी-शर्ट आणि बॅगी जीन्समध्ये दिसली.

आमिर खान आणि किरण राव विभक्त  जुलैच्या पहिल्या आठवड्यात आमिर खान आणि किरण राव यांनी सोशल मीडियावर एक निवेदन जारी करून त्यांच्या घटस्फोटाची माहिती दिली होती. यावेळी त्यांनी निश्चितपणे सांगितलं की हे दोघंही नक्कीच त्यांच्या मुलाच्या आझादसाठी पालक म्हणून एकत्र असतील. मात्र आमिर-किरण वेगळे झाल्यामुळे त्यांचे चाहते खूप निराश झाले आणि आता विमानतळावर दोघांमधील विशेष बंधन पाहून काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर किरण आणि आमिर खानला ट्रोल केलं आहे.

जोरदार ट्रोल “तुम्हाला एकत्र राहायचं होतं मग घटस्फोट का? आणि तुमचा घटस्फोट झाला आहे, तर एकत्र सुट्टी घालवण्यासाठी जाण्यात काय अर्थ आहे? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले.  पण त्याच वेळी,  आमिरच्या काही चाहत्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे, ते किरण-आमिरला सर्वोत्तम पालक म्हणत आहेत जे घटस्फोटानंतरही आपल्या मुलासाठी एकत्र आहेत. बरं, घटस्फोटानंतर किरण आणि आमिर एकत्र दिसण्याची ही पहिली वेळ नाहीये.

आमिर खानचं वर्क फ्रंट आमिरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच लाल सिंह चड्ढामध्ये करीना कपूरसोबत दिसणार आहे. आमिरचा हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसच्या निमित्तानं प्रदर्शित होणार आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ 1994 टॉम हँक्स क्लासिक ‘फॉरेस्ट गंप’ चा हिंदी रिमेक आहे. आमिर खान या चित्रपटात टॉम हँक्सच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर नागा चैतन्य बेंजामिन बुफोर्ड ब्लूची भूमिका साकारताना दिसणार आहे. करीना कपूर खान देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत असेल.

संबंधित बातम्या

Kapil Sharma : ‘मित्रांनो कसा वाटला नवा सेट?’ म्हणत कपिल शर्मानं शेअर केले खास फोटो

Kalki Koechlin daughter : प्रचंड क्यूट आहे कल्की कोचलिनची मुलगी सॅफो, क्यूटनेसमध्ये अनेक स्टार किड्सला देते टक्कर

Raj Kundra Case : पॉर्नोग्राफी प्रकरणी शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला जामीन नाहीच, आता सुनावणी 20 ऑगस्टला

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.