Top 5 News | टायगर श्रॉफच्या आवाजात ऐकायला मिळणार देशभक्तीपर गीत ते अभिनेत्री रेखा यांच्या नव्या मालिकेचा प्रोमो, वाचा मनोरंजन विश्वातील घडामोडी

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 07, 2021 | 10:28 AM

जर तुम्ही शुक्रवार म्हणजेच 6 ऑगस्ट 2021च्या मनोरंजन विश्वाशी संबंधित बातम्या चुकवल्या असतील, तर तुम्ही त्या मनोरंजन टॉप 5 मध्ये वाचू शकता.

Top 5 News | टायगर श्रॉफच्या आवाजात ऐकायला मिळणार देशभक्तीपर गीत ते अभिनेत्री रेखा यांच्या नव्या मालिकेचा प्रोमो, वाचा मनोरंजन विश्वातील घडामोडी
Top News

मुंबई : दररोज मनोरंजन विश्वात काही छोट्या-मोठ्या बातम्या चर्चेत असतातच. चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सशी संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. मनोरंजन विश्वातील बातम्यांच्या दृष्टीनेही कालचा दिवस (6 ऑगस्ट) खूप महत्त्वाचा होता. मात्र, जर तुम्ही शुक्रवार म्हणजेच 6 ऑगस्ट 2021च्या मनोरंजन विश्वाशी संबंधित बातम्या चुकवल्या असतील, तर तुम्ही त्या मनोरंजन टॉप 5 मध्ये वाचू शकता.

टायगर श्रॉफच्या आवाजात ऐकायला मिळणार देशभक्तीपर गीत

टायगर श्रॉफसोबत (Tiger Shroff) जॅकी भगनानीच्या (Jackky Bhagnani) जे जस्ट म्यूझिकनं आज देशभक्ती गीत ‘वंदे मातरम’चे (Vande Mataram) मोशन पोस्टर प्रदर्शित केलं आहे. या गीताला टायगर श्रॉफनं आवाज दिला असून, हे त्याचं पहिलं हिंदी गाणं आहे. या आधी त्यानं गायलेली दोन इंग्रजी गाणी यशस्वी ठरली आहेत. हे गाणे 10 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार, प्रत्येक लहान गावात पोहचणार मदत

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील (Maharashtra Flood) अनेक जिल्ह्यांमध्ये पूराने कहर केला होता. याठिकाणी अडकलेल्या लोकांना प्रत्येक जण शक्य होईल तेवढी मदत करताना दिसत आहे. आता सोनू सूद (Sonu Sood) सुद्धा मदतीसाठी पुढे आला आहे. तो काही भागात अडकल्या लोकांना मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करतो आहे. सोनू चिपळूण, महाड आणि इतर अनेक अंतर्गत भागात मदतीचे पॅकेज पाठवणार आहे.

बिकिनी परिधान करून ‘संजू बाबा’ची लाडकी त्रिशाला जंगलात डायनासोरच्या शोधात!

त्रिशाला दत्त सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत राहते. अलीकडेच तिने आणखी एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या पाठीमोऱ्या मुद्रेत घेतला गेला आहे. या फोटोमध्ये तिचे घनदाट, सुंदर काळे केस स्पष्ट दिसत आहेत आणि तिने हिरव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. फोटो शेअर करताना त्रिशला हिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मी तुम्हाला 66 दशलक्ष वर्षांपूर्वी डायनासोरच्या शोधात घेऊन जात आहे.’

अभिनेत्री रेखा यांच्या अभूतपूर्व सौंदर्यानं आणि खळाळत्या उत्साहानं ‘गुम है किसी के प्यार में’च्या नव्या प्रोमोला लावले चार चाँद!

‘गुम है किसी के प्यार में’ (gum hai kisi ke pyaar me) हा आजपर्यंतचा सर्वात लोकप्रिय टेलिव्हीजन शो ठरला आहे. गेले अनेक दिवस या मालिकेची सर्वत्र चर्चा आहे. चाहत्यांमध्ये याबद्दल एक वेगळी उत्सुकता आहे आणि जेव्हा प्रसिद्ध अभिनेत्री रेखा (Bollywood Actress Rekha) या सीरियलसाठी प्रोमो शूट करतात तेव्हा काय बरं होत असेल?. तर आता रेखा यांनी आपला पहिला प्रोमो शूट केला, तेव्हापासून या शोबाबतची उत्सुकता अनेक पटींनी वाढली आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’नंतर ‘राणा दा’ म्हणणार ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?’

‘राणा दा’ साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी वाहिनीवर सुरु होत असलेली नवी मालिका ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?’ (Tuzhya Majhya Sansarala Aani Kay Hava) यात हार्दिक मुख्य भूमिका साकारणार असल्याचे कळते आहे. वाहिनीकडून अद्पाय यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले नसले, तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हार्दिक जोशी आता ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ असं म्हणणार आहे. या मालिकेत नवोदित अभिनेत्री अमृता पवार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :

जेव्हा एका गाण्यामुळे एसडी बर्मन आशा भोसलेंवर नाराज होतात! वाचा ‘छोड दो आँचल’ गाण्याचा किस्सा

पद्मिनी कोल्हापुरे प्रिन्स चार्ल्सच्या स्वागताला गेल्या.. आणि ब्रिटनमध्येही खळबळ उडाली! वाचा ‘या’ भेटीचा किस्सा!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI