2 मुलींच्या बापासोबत लेकीला अशा अवस्थेत पाहताच प्रसिद्ध अभिनेत्याचा झालेला तिळपापड, उचलेलं मोठं पाऊल
इंडस्ट्रीमध्ये अनेक अशा घटना घडत असतात, ज्यामुळे खळबळ उटडे... काही वर्षांपूर्वी देखील असंच काही झालं होतं. लेकीला 2 मुलींच्या बापासोबत पाहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा तिळपापड झालेला... जाणून घ्या त्यानंतर नक्की काय घडलं होतं.

बॉलिवूडमध्ये कधी कोणाचं नाव कोणासोबत जोडलं काहीही सांगता येत नाही. विवाहित आणि आनंदी कुटुंब असून देखील अनेक अभिनेत्याचं अफेअर असल्याचं समोर आलं. एवढंच नाही तर, बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि गायक याच्यासोबत देखील असंच काही घडलं. अभिनेत्याचं लग्न तर झालं पण, नातं फार काळ टिकलं नाही. 2 मुलींच्या जन्मानंतर अभिनेत्याचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं. घटस्फोटाच्या काही महिन्यांनंतर अभिनेत्याला प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीसोबत एका खोलीत नको त्या अवस्थेत स्पॉट करण्यात आलं… त्यानंतर अभिनेत्याने यावर मोठं वक्तव्य देखील केलं.
सध्या ज्या सेलिब्रिटींची चर्चा रंगली आहे, ते दुसरे तिसरे कोणी नाही तर, अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर आहे. एक काळ असा होता, जेव्हा फरहान आणि श्रद्ध कपूर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरलेला. सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा आणि फरहान यांच्या नात्याची चर्चा होती. पण एका धक्कादायक प्रसंगानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले.
असं सांगितलं जातं की, 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रॉक ऑन 2’ सिनेमानंतर फरहान आणि श्रद्धा यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला. रिपोर्टनुसार, सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असं देखील अनेकदा समोर आलं.
याचदरम्यान, फरहान याला भेटण्यासाठी श्रद्धा त्याच्या घरी पोहोचली होती. तेव्हा फरहान आणि श्रद्धा एकाच घरात असल्याचं शक्ती कपूर यांना कळलं. तेव्हा शक्ती कपूर तात्काळ फरहान याच्या घरी पोहोचले आणि श्रद्धाला बाहेर काढळं.
तेव्हा परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणून श्रद्धाने देखील काहीही न बोलता वडिलांसोबत स्वतःच्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. यावर शक्ती कपूर यांना एकदा विचारण्यात देखील आलं होतं. तेव्हा ते म्हणालेले, ‘असं काहीही नाही…अशा अफवा कायम रंगत असतात.’, त्यानंतर श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर कधीही एकत्र दिसले नाहीत.
श्रद्धा कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘आशिकी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्रीने मागे वळून पाहिलं नाही. श्रद्धाने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. श्रद्धा फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर श्रद्धा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
