AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्रीकडून मोलकरणीचा छळ, निर्वस्त्र व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न आणि…

मोलकरणीचा छळ आणि निर्वस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न आणि..., प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अडचणीत मोठी वाढ... अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीने केलेल्या वाईट कृत्याची चर्चा...

प्रसिद्ध अभिनेत्रीकडून मोलकरणीचा छळ, निर्वस्त्र व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न आणि...
फाईल फोटो
| Updated on: Oct 01, 2025 | 12:34 PM
Share

झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीने मोलकरणीचा छळ केला आहे. एवढंच नाही तर, निर्वस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. ज्यामुळे अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तमिळ आणि तेलुगू अभिनेत्री डिंपल हयाती गंभीर अडचणीत सापडली आहे. हैदराबाद पोलिसांनी अभिनेत्री आणि तिचा पती डेव्हिड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्रीच्या मोलकरणीने त्यांच्यावर छळ, मारहाण आणि गैरवर्तनाचा आरोप करत तक्रार दाखल केली. हैदराबादमधील फिल्मनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

रिपोर्टनुसार, अभिनेत्रीच्या घरी काम करणाऱ्या तरुणीचं वय 22 वर्ष आहे आणि ती ओडिशा येथील राहणारी आहे. श्री साई गुडविल सर्विसेजच्या माध्यमातून पीडित तरुणी डिंपल हिच्या घरात कामासाठी होती. ती 22 सप्टेंबर रोजी ओडिशाच्या रायगडा जिल्ह्यातून कामाच्या शोधात हैदराबादला आली होती. तिला डिंपल हयाती आणि तिचा पती डेव्हिड यांच्या घरी मोलकरणीची नोकरी मिळाली.

मोलकरणीचे आरोप – खायला दिलं नाही आणि अपमानित केलं…

पीडित तरुणीने जबाबात आरोप केला आहे की, अभिनेत्रीच्या घरी कामाला सुरुवात केल्यापासून सतत अपमानित केलं जात होतं, ज्यामध्ये योग्य जेवण न देणं, शिवीगाळ करणं आणि अपमानास्पद टिप्पणी करणं यांचा समावेश होता. मोलकरणीच्या म्हणण्यानुसार, त्या अभिनेत्री आणि नवऱ्याने तरुणीला असंही सांगितलं की, तिचं आयुष्य त्यांच्या बुटांच्या किमतीलाही किंमत नाही.

डिंपलच्या नवऱ्याने मोलकरणीकडून फोन हिसकावून घेतला..

मोलकरणीने सांगितल्यानुसार, 29 सप्टेंबर रोजी त्यांच्यामध्ये वाद झाला. डिंपल आणि डेव्हिड यांनी मोलकरणीसोबत गैरवर्तण केलं आणि आई – वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. जेव्हा तरुणीने व्हिडीओ रेकॉर्ट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा डेव्हिडने फोन हिसकावून घेतला आणि तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

मोलकरीणाने असाही दावा केला की, हाणामारीदरम्यान तिचे कपडे फाटले होते आणि निर्वस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप केला. अखेर मोलकरणीने तिच्या एजंटच्या मदतीने पोलिसांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले आणि थोडक्यात बचावली.

कोण आहे डिंपल हयाती?

डिंपल हयाती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, 2017 मध्ये तिने तेलुगू ‘गल्फ’ सिनेमातून अभिनय विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ती ‘अकरंगी रे’ सिमेमात देखील दिसली. याशिवाय अभिनेत्रीने ‘देवी 2’, ‘खिलाडी’, ‘यूरेका’, Ramabanam आणि Veeramae Vaagai Soodum सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.