AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘छावा’: चित्रपट पाहून आला अन् थिएटरच्या छतावर चढला; जयघोष करत चाहत्याकडून विकीच्या बॅनरला दुग्धाभिषेक

विकी कौशलच्या "छावा" चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटात त्याने साकारलेली संभाजी महाराजांची भूमिका अद्भुत असून चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणतं. चित्रपट पाहून एका चाहत्याने चक्क थिएटरबाहेर असलेल्या विकीच्या पोस्टरला दुधाचा अभिषेक करून आपला चाहताभाव व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'छावा': चित्रपट पाहून आला अन् थिएटरच्या छतावर चढला; जयघोष करत चाहत्याकडून विकीच्या बॅनरला दुग्धाभिषेक
| Updated on: Feb 15, 2025 | 9:04 PM
Share

सध्या सगळीकडे विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाचीच चर्चा आहे. चित्रपटाच्या रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील डायलॉग आणि सीन्स अंगावर शहारे आणतात. अनेक जण तर एकदा पाहिल्यानंतर दुसऱ्यांदाही चित्रपट पाहायला जाणार असल्याचं म्हणताना दिसत आहेत. चाहत्यांकडून विकीचं प्रचंड कौतुक होत आहे.

सगळे थिएटर हाऊसफूल

14 फेब्रुवारीला चित्रपट रिलीज झाला. सगळे थिएटर हाऊसफूल पाहायला मिळत आहेत.प्र त्येक वयोगटातील प्रेक्षक हा सिनेमा पाहून मंत्रमुग्ध झाला आहे. छत्रपती संभाजी राजांचे बलिदान रुपेरी पडद्यावर पाहताना प्रत्येकाच्या डोळे पाणावले. एकूणच या सिनेमाला खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

विकीच्या पोस्टरला चाहत्याकडून दुग्धाभिषेक

दरम्यान या चित्रपटाबाबतचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. ज्यात एका चाहत्याने थिएटरबाहेर लागलेल्या विकीच्या पोस्टरवर दुधाचा अभिषेक केला आहे. स्वतः विकी कौशलने हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमधील मुलाने भगव्या रंगाचा सदरा घातला असून तो सिनेमागृहाच्या छतावर उभा होता.

यावेळी तो जोरजोरात जयघोषही करताना दिसत आहे. त्याला खाली उभे असलेले इतर प्रेक्षक प्रतिसादही देताना दिसत आहे. त्यानंतर त्याने हातातील दुधाची पिशवी फोडून त्यातील दुधाने थिएटरबाहेर उभारलेल्या विकीच्या बॅनरला थेट दुग्धाभिषेक केला.

विकीने साकारलेली संभाजी महाराजांची भूमिका नि:शब्द करणारी 

यावरूनच लक्षात येतं की या चित्रपटात विकीने साकारलेली संभाजी महाराजांची भूमिका ही पाहणाऱ्याला किती नि:शब्द करते ते. विकीने शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

औरंगजेबाच्या भूमिकेतील अक्षय खन्नाचंही कौतुक

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांचंही तेवढंच कौतुक होत आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानाने केलेल्या महाराणी येसूबाईंच्या भूमिकेचंही कौतुक होताना दिसत आहे. तर विकीनंतर जर प्रेक्षकांच्या तोंडी नाव असेल तर ते अक्षय खन्नाचं. औरंगजेबाच्या भूमिकेतील अक्षय खन्नाने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.