करिश्मा कपूरच्या चेहऱ्यावर म्हातापणाच्या खुणा; चाहते झाले भावनिक म्हणाले ‘ती पूर्वीसारखी…’
काही दिवसांपूर्वी, राज कपूर यांच्या चित्रपटसृष्टीतील 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित 'भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे शोमन' या सोहळ्यात कपूर कुटुंबाने हजेरी लावली होती.यावेळी करिश्मा कपूरचाही लूक दिसला. पण करिश्मा कपूरच्या या लूकने तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले.

बॉलिवूडची स्टार करिश्मा कपूर आजही लाइमलाइटमध्ये कायम आहे. करिश्मा कपूरने 90 च्या दशकात अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. करिश्मा आता प्रामुख्याने सोशल मीडियावर सक्रिय असते. तसेच, बी-टाऊनच्या पार्ट्यांमध्येही ती सहभागी होण्यास विसरत नाही. काही दिवसांपूर्वी करिश्मा कपूर तिचे आजोबा आणि दिग्गज अभिनेते राज कपूर यांच्या सिनेमातील 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या ‘भारतीय सिनेमातील सर्वश्रेष्ठ शोमॅन’ या उत्सवात दिसली होती. यावेळी करिश्मा कपूरच्या लूकने तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. तोच व्हिडिओ आता पुन्हा व्हायरल होताना दिसत आहे.
करिश्माला पाहून चाहते भावनिक
या व्हिडिओमध्ये करिश्मा कपूर तिच्या आई बबिताचा हात धरून तिला घेऊन जाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये करिश्माच्या चेहऱ्यावर तिच्या वयाची झलक स्पष्ट दिसत आहे. करिश्मा कपूर सध्या 50 वर्षांची आहे. करिश्माच्या या लूकने तिच्या चाहत्यांना भावनिक केले. करिश्माच्या लूकवर एका चाहत्याने लिहिले, “करिश्मा एकेकाळी स्टार होती.” दुसऱ्या चाहत्याने लिहिले, “90 च्या दशकातील लोलो आता पूर्वीसारखी राहिली नाही.” तर, तिसऱ्या चाहत्याने लिहिले, “मी आजही करिश्माचा चाहता आहे.” चौथ्या चाहत्याने लिहिले, “करिश्माच्या चेहऱ्यावर आता वय दिसत आहे.” करिश्माला पाहून तिचे चाहते अशा प्रकारे भावनिक होऊन कमेंट्स करत आहेत.
View this post on Instagram
करिश्मा कपूरच्या कामाबद्दल बोलायचं तर
करिश्मा कपूरने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून पदार्पण केले. कपूर कुटुंबातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी करिश्मा ही पहिली महिला आहे. पदार्पणानंतर करिश्माने ‘जिगर’, ‘मुकाबला’, ‘राजा बाबू’, ‘अंदाज अपना-अपना’, ‘सुहाग’, ‘गोपी किशन’, ‘कुली नंबर 1’, ‘साजन चले ससुराल’, ‘जीत’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘जुडवां’, ‘हिरो नंबर 1’, ‘बीवी नंबर 1’, ‘हसीना मान जाएगी’, ‘हम साथ-साथ हैं’, ‘चल मेरे भाई’ आणि ‘हां मैंने भी प्यार किया है’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले आहे. अलीकडे करिश्मा ‘मर्डर मुबारक’ या चित्रपटात दिसली होती. सध्या ती ‘इंडियाज बेस्ट डान्सर 4’ या डान्स रियॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे.
