बीएमडब्ल्यू कार चालवतो, तीन मजली बंगला; फराह खानचा शेफ सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही
फराह खानच्या अलीकडच्या युट्यूब व्लॉगमध्ये तिच्या शेफ दिलीपची झलक दाखवण्यात आली. तसेच तिच्या या व्लॉगमधून असेही समजले की दिलीप बीएमडब्ल्यू कार चालवतो आणि त्याचा तीन मजली बंगला आहे. तो शाहरुख खानसोबत काम करण्यास उत्सुक आहे आणि फराह खान त्याला तिच्या पुढच्या चित्रपटात कास्ट करण्याचाही विचार करत आहेत. त्यामुळे तिचा शेफ हा एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही.

कोरिओग्राफर, फिल्ममेकर फराह खानचं चित्रपटसृष्टीत खूप मोठं नाव आहे.तिची एक खास ओळख आहे. मात्र आता फराह खान प्रसिद्ध आहे ती तिच्या यूट्यूब व्हीलॉगिंगमुळे. फराहने सुमारे 11 महिन्यांपूर्वी व्हीलॉगिंग सुरू केली आणि तेव्हापासून तिने अनेक सेलिब्रिटींच्या घरी जाऊन चाहत्यांना त्या स्टार्सची ओळख करून दिली. अलिकडच्या व्हीलॉगमध्ये फराहने करण वाहीच्या घरी भेट दिली आणि या व्हिडिओमध्ये तिने तिच्या शेफ दिलीपबद्दल सांगितले.
फराह खानचा शेफ दिलीप बीएमडब्ल्यू चालवतो.
फराह खानने सांगितले की तिचा शेफ शाहरुख खानसोबत शूटिंग करण्यास उत्सुक आहे.करणच्या घरी शिरा बनवत असताना फराह खानने दिलीपला विचारले, “परवा कोणासोबत शूटिंग आहे?” ज्यावर दिलीपने लगेच उत्तर दिले, शाहरुख खान सर. करणने विचारले की त्याचा ड्रायव्हर त्याला शूटिंगला घेऊन जातो का? ज्यावर दिलीपने उत्तर मजेशीर उत्तर दिले, “जर फराह मॅडमने माझ्यासाठी कार खरेदी केली , तर मी तिला घेऊन जाईन.”त्यावेळी दिलीपला कोणती कार आवडते असे विचारलं असता, दिलीपने उत्तर दिले – “सध्या मी बीएमडब्ल्यू चालवतो”
“मी थोडी जास्त महागडी कार खरेदी करण्याचा विचार करत आहे”
फराह खानच्या शेफने म्हटले, “मी यापेक्षा थोडी महागडी कार खरेदी करण्याचा विचार करत आहे.” हे ऐकून फराह खानला धक्का बसला आणि ती म्हणाली, “अर्थातच मी एक मॉन्सटर बनवला आहे.” फराह खानने विचारलं की त्याच्याकडे सध्या कोणती कार आहे? तेव्हा दिलीपने लगेच सांगितले की तो एक नवीन कार खरेदी करेल. तेव्हा फराह खान गमतीने म्हणाली ” तो सेकंड हँड कार चालवत नाही”,यावेळी चित्रपट निर्मात्याने दिलीपला गंमतीने म्हटलं की, “मी तुमच्यासाठी एक उत्तम बस किंवा ट्रेन देखील खरेदी करू शकतो. हे कसं राहिलं?”
दिलीपचे घर कसं आहे?
फराह खानने हेही म्हटले की, ती तिच्या पुढच्या चित्रपटात कास्ट करणार असल्याचंही म्हटलं आहे. एवढंच नाही तर फराह खानने व्लॉगमध्ये हेही सांगितले की दिलीपचा बिहारमध्ये तीन मजली बंगला देखील आहे. त्यात 6 बेडरूम आहेत. त्यावर दिलीपने उत्तर दिले की त्याची पत्नी, पालक आणि दोन मुले त्या बंगल्यात राहतात. आणि तो इथे मुंबईत फराह खानसाठी काम करतो.
एकंदरीत फराह खानने दिलेल्या माहिती वरून तिचा शेफ दिलीप हा खरोखरच गजगंज श्रीमंत आहे हे लक्षात येत. अर्थात त्याने ही श्रीमंती त्याच्या कष्टाने कमावली आहे. पण सध्या तो एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही.
