AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडील मुस्लीम, आई ब्राह्मण, कोणता धर्मा मानतो अमाल मलिक?

'बिग बॉस 19' मध्ये गायक अमाल मलिक चांगली खेळी खेळत आहे. प्रत्येक टास्कमध्ये अमाल पुढ आहे. एवढंच नाहीतर, घरात अमाल खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे देखील करताना दिसत आहे. त्याने स्वतःच्या धर्माबद्दल देखील सांगितलं आहे...

वडील मुस्लीम, आई ब्राह्मण, कोणता धर्मा मानतो अमाल मलिक?
फाईल फोटो
| Updated on: Sep 27, 2025 | 9:09 AM
Share

Bigg Boss 19 Contestants Amaal Mallik: ‘बिग बॉस 19’ च्या घरातील स्पर्धक सध्या सर्वत्र तुफान चर्चेत आहेत. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक गोष्टी आता हळूहळू समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अमाल मलिक याची देखील चर्चा तुफान रंगली आहे. काही दिवसांपूर्वी अमाल याने स्वतःच्या कुटुंबातील मोठं सत्य सर्वांना सांगितलं. आता अमाल कोणता धर्म मानतो… हे देखील त्याने स्वतःने सांगितलं आहे. अमाल याने स्वतःच्या धर्माबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

एका मुलाखतीत अमाल याला त्याच्या धर्माबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा अमाल म्हणाला, ‘माझे वडील मुस्लीम आहेत आणि माझी आई सारस्वत ब्राह्मण हिंदू आहे. जेव्हा मला एकटं किंवा मी दुःखी आहे असं मला वाटतं तेव्हा मी वांद्रे येथील माउंट मेरी चर्चमध्ये जातो…’

‘मी प्रचंड आध्यात्मिक आणि देवावर विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे. मी देवाला घाबरत नाही. पण जगात एक चांगली ऊर्जा आहे, ज्यामुळे प्रत्येक दिवस उत्तम ठरतो आणि आयुष्यात काही चांगलं करण्यासाठी कोणाचा तरी आशीर्वाद पाठीशी आहे.. असं वाटतं… म्हणून मी कोणत्याच गोष्टीसाठी कट्टर नाही…’

‘मी कोणताच धर्म मानत नाही…’ असं देखील अमाल म्हणाला. अमाल याच्या वडिलांच नाव इसरार सरदार डब्बू मलिक असं आहे. तर त्याच्या आईचं नाव ज्योती असं आहे. दरम्यान अमाल याने बिग बॉसच्या घरात कुटुंबियांकडून झालेल्या अन्यायाबद्दल देखील सांगितलं. आई प्रेग्नेंट असताना तिला प्रचंड त्रास दिला असं देखील अमाल म्हणाला होता.

प्रेग्नेंसीमध्ये आईने खूप काही सहन केलं…

अमाल म्हणाला, ‘जेव्हा आई गरोदर होती तेव्हा तिने अनेक समस्यांचा समाना केला. लोकं म्हणतात मी खूप शिव्या देतो. मी खूप मानसिक आघात सहन केला आहे. आई गरोदर असताना तेव्हा तिच्यावर खूप अत्याचार झाले. आम्ही त्यावेळी एकत्र कुटुंबात राहत होतो म्हणून तिच्याकडून घरातील खूप काम करून घ्यायचे. एके दिवशी आईने रागाने कपाटावर हात आपटला. आज आपण जिथे आहोत ते फक्त आणि फक्त आईमुळे आहोत. ‘ बिग बॉसमुळे अमाल याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली आहे.

Follow Us
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?.
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय.
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात.
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा...
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा....
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?.
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत.