AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्यों किसी को वफा के बदले…, ऐश्वर्यामुळे ‘तेरे नाम’च्या सेटवर का रडायचा सलमान खान?

2001 मध्ये अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर 2003 मध्ये सलमानचा 'तेरे नाम' सिनेमा प्रदर्शित झाला. पण सिनेमाच्या सेटवर सलमान कायम रडायचा... तो किस्सा समीर अंजान याने सांगितला.

क्यों किसी को वफा के बदले..., ऐश्वर्यामुळे 'तेरे नाम'च्या सेटवर का रडायचा सलमान खान?
| Updated on: Sep 26, 2025 | 2:27 PM
Share

बॉलिवूडमध्ये असंख्य हीट गाणी लिहिणारे समीर अंजान याने अभिनेता सलमान खान, गोविंदा, शाहिद कपूर आणि करीना कपूर यांसारख्या सेलिब्रिटींच्या सिनेमांसाठी गाणी लिहिली आहे. ‘तेरे नाम’ सिनेमातील गाण्यांसाठी त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्यांनी सिनेमातील टायटल ट्रॅकबद्दल मोठा खुलासा केला आहे. गाणं शूट होण्यापूर्वी सलमान खान सेटवर कायम गाणं गायचा आणि रडायचा… ही त्या वेळची गोष्ट आहे, जेव्हा ऐश्वर्या आणि सलमान खान यांचं ब्रेकअप झालं होतं आणि ते दुःख नुकताच आयुष्यात आलं होतं.

नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये समीर याने ‘तेरे नाम’ सिनेमातील टायटल ट्रॅकबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘ते टायटल ट्र्र सलमान खान याला लक्षात ठेवून तयार करण्यात आलंच नव्हतं… ऐश्वर्या राय हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ते गाणं त्यांच्या नात्यावर लिहिण्यात आलं होतं… गाणं शूट करण्यापूर्वी सलमान कायम हिनेशला बोलवायचा आणि त्याच्यासोबत गाणं गात रडायचा…’

‘सलमान, हिमेशला बोलवायचा आणि म्हणायचा मला गाणं ऐकव… ‘क्यों किसी को वफा के बदले वफा नही मिलती…’ त्याला वाटलं हे गाण तिथपर्यंत जायला पाहिजे, जिथे माझं दुःख आहे…’ सिनेमातील गाणी आजही हीट आहेत.

‘तेरे नाम’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, 2003 मध्ये सिनेमा प्रदर्शित झाला होता. सिनेमाचा कंपोझर हिनेश रेशमिया होता. तर गाण्यांना आवाज गायक उदित नारायण आणि गायिका अल्का यागनिक यांनी दिला. सिनेमात सलमान खान याच्यासोबत अभिनेत्री भुमिका चावला मुख्य भूमिकेत होती.

सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सलमान खान याची हेअरस्टाईल तरुणांमध्ये लोकप्रिय ठरली. असंख्य तरुणांनी सलमान खान सारखी हेअरस्टाईल केली. आजही चाहत्यांमध्ये सलमान खान याची असलेली क्रेझ कमी झालेली नाही. आजही सलमानच्या आगामी सिनेमासाठी चाहते उत्सुक असतात.

सलमान खान फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या अफेअरच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये सुरु असतात. एक काळ असा होता, जेव्हा दोघे चाहत्यांना कपल गोल्स देत होते. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण दोघांच्या नात्याचा अंत फार वाईट झाला.

Follow Us
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?.
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय.