Happy Birthday Jaya Prada : अभिनेत्री ते राजकारणी, जाणून घ्या जया प्रदा यांच्या वाढदिवसानिमित्त खास गोष्टी

लीवूड अभिनेत्री (Bollywood Actress) ते राजकारणी (Politician) जया प्रदा (Jaya Prada) याचा आज 3 एप्रिल रोजी वाढदिवस आहे. जया प्रदा यावर्षी 59 वा वाढदिवस साजरा करतील. जयाप्रदा यांचा जन्म 3 एप्रिल 1962 रोजी आंध्र प्रदेशमध्ये झाला. जयाप्रदा यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत.

Happy Birthday Jaya Prada : अभिनेत्री ते राजकारणी, जाणून घ्या जया प्रदा यांच्या वाढदिवसानिमित्त खास गोष्टी
जाणून घ्या जया प्रदा यांच्या वाढदिवसानिमित्त खास गोष्टीImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 6:00 AM

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री (Bollywood Actress) ते राजकारणी (Politician) जया प्रदा (Jaya Prada) याचा आज 3 एप्रिल रोजी वाढदिवस आहे. जया प्रदा यावर्षी 59 वा वाढदिवस साजरा करतील. जयाप्रदा यांचा जन्म 3 एप्रिल 1962 रोजी आंध्र प्रदेशमध्ये झाला. जयाप्रदा यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. बॉलीवूडमध्येच नव्हे तर राजकारणातही त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. तेलगु चित्रपट त्यांनी सुरूवातीला काम केलं. तिथून जया प्रदा यांनी अभिनेत्री म्हणून करिअर सुरुवात केली. त्यांनी अनेक विविध भाषांमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. आजही त्याचे चाहते चित्रपट आवर्जुन पाहत असतात. किंवा एखाद्या चित्रपटातली भूमिका कशी साकारली होती त्याचं उदाहरण देतात.

View this post on Instagram

A post shared by Jaya Prada (@jayapradaofficial)

त्यांचे गाजलेले चित्रपट तुम्हाला माहित आहेत का ?

अभिनेत्री जया प्रदा यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला तेलुगू चित्रपट ‘भूमिकोसम’मधून सुरुवात केली. 1979 साली विश्वनाथ दिग्दर्शित ‘सरगम’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पण त्याला ओळख मिळाली ती 1984 मध्ये आलेल्या ‘तोहफा’ या चित्रपटामधून. या चित्रपटात त्यांनी तत्कालीन सुपरस्टार जितेंद्र आणि श्रीदेवी यांच्यासोबत काम केले आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक देखील झाले होते. यानंतर त्यांनी ‘शराबी’, ‘आज का अर्जुन’, ‘औलाद’, ‘मा’, ‘सिंदूर’, ‘आखरी रास्ता’, ‘स्वर्गातून सुंदर’, ‘कामचोर’, ‘पाताळ भैरवी’, ‘असे चित्रपट केले. आवाज’ मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.

राजकीय प्रवास

अभिनेत्री जया प्रदा यांनी 1994 मध्ये तेलुगु देसम पार्टीमधून आपला राजकीय प्रवास सुरू केला. दोन वर्षांनंतर, 1996 मध्ये, त्यांना तेलुगू देसम पक्षाने राज्यसभेवर पाठवले. पण काही गोंधळामुळे 2004 मध्ये समाजवादी पक्षाच्या तिकिटावर त्या निवडणूक जिंकल्या आणि रामपूरमधून खासदार झाल्या. पण 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि लोकसभा निवडणुकीत रामपूरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. पण जया प्रदा त्या निवडणूक हरल्या, त्यानंतर जया प्रदा राजकारणापासून लांब राहत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Malaika Arora Accident MNS : मलायका जखमी झालेल्या अपघातात मनसेच्या कार्यकर्त्यांचीही गाडी, सोलापूरची ट्रॅव्हल्स असल्याची प्राथमिक माहिती

Meteor Showers or Satellite Video: ऐन गुढीपाडव्याच्या रात्री विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उल्कावर्षाव, चंद्रपूर, वाशिम, अकोल्यातले व्हिडीओ वेगानं पसरले

Raj Thackeray LIVE : राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका, दुसरं टार्गेट शरद पवार

Non Stop LIVE Update
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो.