AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gadar | 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर ‘गदर’ची कमाल; तीन दिवसांत कमावले इतके कोटी रुपये

तब्बल 22 वर्षांनंतर 'गदर: एक प्रेम कथा' या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी निर्मात्यांनी पहिला चित्रपट थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाने पुन्हा एकदा दमदार कमाई केली आहे.

Gadar | 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर 'गदर'ची कमाल; तीन दिवसांत कमावले इतके कोटी रुपये
GadarImage Credit source: Twitter
| Updated on: Dec 29, 2024 | 3:55 PM
Share

मुंबई : अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर : एक प्रेम कथा’ हा चित्रपट जेव्हा 2021 मध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा बॉक्स ऑफिसवर तो तुफान हिट ठरला होता. त्यावेळी या चित्रपटाची तब्बल पाच कोटी तिकिटं विकली गेली होती. सनी देओल आणि अमिषा पटेलची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. आता 22 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गदर 2’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी निर्मात्यांनी पहिला भाग पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाला आतासुद्धा बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळतोय. अवघ्या तीन दिवसांत ‘गदर’ने 1.30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

‘गदर’ने पहिल्याच दिवशी 30 लाख रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 45 लाख रुपयांचा गल्ला जमवला. तिसऱ्या दिवशी ‘गदर’ने 55 लाख रुपये कमावले. देशातील काही मोजक्या स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. गेल्या 22 वर्षांपासून हा चित्रपट ऑनलाइन सर्वत्र उपलब्ध होता. मात्र तरीसुद्धा थिएटरमध्ये होणारी ही कमाई उल्लेखनीय आहे. बॉक्स ऑफिसच्या या आकड्यांवरून ‘गदर 2’विषयी प्रेक्षकांमध्ये किती उत्सुकता आहे, हे पहायला मिळतंय.

‘गदर : एक प्रेम कथा’ची तीन दिवसांची कमाई-

पहिला दिवस- 30 लाख रुपये दुसरा दिवस- 45 लाख रुपये तिसरा दिवस- 55 लाख रुपये

‘गदर 2’मध्ये आता तारा सिंग म्हणजेच सनी देओलच्या मुलाची कथा दाखवण्यात येणार आहे. सनी देओलच्या मुलाची भूमिका अभिनेता उत्कर्ष साकारणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लखनऊ आणि महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये पाकिस्तानसारखा सेट तयार करण्यात आला. गदर 2 मधील पाकिस्तानच्या सीनसाठी लखनऊमध्ये 50 दिवस शूटिंग करण्यात आली. तर अहमदनगरमध्ये 25 दिवसांची शूटिंग झाली. गदर 2 मधील ॲक्शन सीन्ससाठी टीनू वर्मा आणि साऊथचे रवी वर्मा यांची मदत घेण्यात आली. यांनी शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटातील ॲक्शन सीन्सवर काम केलं होतं. याशिवाय विकी कौशलचे वडील श्याम कौशल यांचंही चित्रपटाच्या ॲक्शन सीन्समध्ये मोठं योगदान आहे. गदर 2 हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.