AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gadar 2 | “.. वरना इस बार वह दहेज में लाहौर ले जाएगा”; ‘गदर 2’चा जबरदस्त टीझर पाहिलात का?

सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा 'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 22 वर्षांनी याचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीक्वेलचा दमदार टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे.

Gadar 2 | .. वरना इस बार वह दहेज में लाहौर ले जाएगा; 'गदर 2'चा जबरदस्त टीझर पाहिलात का?
Gadar 2 teaserImage Credit source: Youtube
| Updated on: Dec 29, 2024 | 3:57 PM
Share

मुंबई : अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर : एक प्रेम कथा’ हा चित्रपट जेव्हा 2001 मध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा बॉक्स ऑफिसवर नवीन इतिहास रचला गेला होता. यामध्ये सनी देओल, अमिषा पटेल, अमरिश पुरी यांच्या मुख्य भूमिका होत्या. आता तब्बल 22 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गदर 2’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये तारा सिंगच्या भूमिकेतील सनी देओलची जबरदस्त झलक पहायला मिळत आहे. 1971 च्या काळात भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धाची पार्श्वभूमी या सीक्वेलच्या कथेला देण्यात आली आहे.

यामध्ये सनी देओल पुन्हा एकदा अँग्री यंग मॅन तारा सिंगच्या अंदाजात आणि अमिषा पटेल सकिनाच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटात पाकिस्तानी जनरल कादिरची भूमिका साकारलेला अभिनेता मनीष वाधवा ‘गदर 2’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत आहे. गदर 2 मध्ये आता तारा सिंग म्हणजेच सनी देओलच्या मुलाची कथा दाखवण्यात येणार आहे. या टीझरची सुरुवात एका डायलॉगने होते. “दामाद है वो पाकिस्तान का, उसे नारियल दो, टिका लगाओ, वरना इस बार वह दहेज में लाहौर ले जाएगा”, असा हा डायलॉग आहे. त्यानंतर पाकिस्तानमध्ये जागोजागी ‘क्रश इंडिया’चे पोस्टर लावताना दिसतात. भारताविरोधातील या रोषाच्या पार्श्वभूमीवर तारा सिंगची झलक पहायला मिळते.

पहा टीझर-

या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लखनऊ आणि महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये पाकिस्तानसारखा सेट तयार करण्यात आला. गदर 2 मधील पाकिस्तानच्या सीनसाठी लखनऊमध्ये 50 दिवस शूटिंग करण्यात आली. तर अहमदनगरमध्ये 25 दिवसांची शूटिंग झाली. गदर 2 मधील ॲक्शन सीन्ससाठी टीनू वर्मा आणि साऊथचे रवी वर्मा यांची मदत घेण्यात आली. यांनी शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटातील ॲक्शन सीन्सवर काम केलं होतं. याशिवाय विकी कौशलचे वडील श्याम कौशल यांचंही चित्रपटाच्या ॲक्शन सीन्समध्ये मोठं योगदान आहे.

गदर 2 मध्ये तारा सिंग म्हणजेच सनी देओलच्या मुलाची भूमिका अभिनेता उत्कर्ष साकारणार आहे. उत्कर्षसोबतही ॲक्शन सीन्स शूट करण्यात आले आहेत. पाकिस्तानी सैन्यासोबतही त्याचे काही ॲक्शन सीन्स आहेत. “या सीक्वेलच्या शूटिंगसाठी वर्षभराचा काळ लागला. मला पाच-सहा महिन्यांत शूटिंग संपवायची होती. पण तेव्हा ओमायक्रॉनची लाट, कोरोना आणि पावसामुळे आम्हाला शूटिंग पुढे ढकलावं लागलं. आम्ही जेव्हा सेटवर पोहोचलो, तेव्हा जणू आम्ही वीस वर्षांपूर्वीच्या कालावधीत पोहोचलो, असंच जाणवलं. तो क्षण खूपच भावनिक होता. शूटिंगदरम्यान बहुतांश तीच लोकं होती, ज्यांनी गदरमध्ये काम केलं होतं”, असं दिग्दर्शक म्हणाले.

Follow Us
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?