‘गँग्स ऑफ वासेपूर’ फेम अभिनेत्यावर फसवणुकीचा आरोप, FIR दाखल

'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याविरोधात पुन्हा एकदा FIR दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्यावर फसवणुकीचा आरोप, FIR दाखल
अभिनेता झीशान कादरीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 21, 2022 | 8:11 AM

रांची: ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटात डेफिनेटची भूमिका साकारणारा अभिनेता झीशान कादरी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. झीशानवर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात रांची मधल्या हिंदपिढी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. रांची मधल्या एका हॉटेलचे थकीत 29 लाख रुपये न दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याप्रकरणी अद्याप झीशानने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

याआधीही FIR दाखल

याआधीही झीशानवर फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता. शालिनी चौधरी नावाच्या एका महिलेनं त्याच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. इतकंच नव्हे तर झीशान तिला सतत जीवे मारण्याची धमकी देत होता, असाही गंभीर आरोप संबंधित महिलेनं केला होता.

याप्रकरणी झीशानने त्यावेळी प्रतिक्रिया दिली होती. शालिनी आणि तिचा मुलगा माझ्यावर खोटे आरोप करत आहेत, माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा बचाव त्याने केला होता. पब्लिसिटी स्टंट म्हणत त्याने शालिनीचे आरोप फेटाळले होते. सेलिब्रिटींविरोधात केल्या जाणाऱ्या खोट्या आरोपांविरोधात कायदेशीर कारवाईचा आग्रहसुद्धा त्याने केला होता.

हे सुद्धा वाचा

दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटाची कथा झीशाननेची लिहिली होती. त्याचसोबत त्याने चित्रपटान सरदार खानचा तिसरा मुलगा डेफिनेटची भूमिका साकारली होती. चित्रपटातील त्याचे सीन्स सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते. त्याच्या सीन्सवरून आजही मीम्स व्हायरल होतात. या चित्रपटात झीशानसोबतच मनोज बाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दिकी, पंकज त्रिपाठी, ऋचा चड्ढा, हुमा कुरेशी आणि तिग्मांशु धुलिया यांनी भूमिका साकारल्या होत्या.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.