AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 साल खेल गई मेरे साथ..; आकांक्षावर गौरव खन्नाची बोचरी टिप्पणी, फराह खानसुद्धा चकीत!

अभिनेता गौरव खन्ना 'लॉक अप 2' या शोमध्ये पोहोचला आहे. त्याची पत्नी आकांक्षा चमोलाने काही दिवसांपूर्वीच दोघांच्या घटस्फोटाबद्दल मोठा खुलासा केला होता. त्यानंतर शोमध्ये गौरवने आकांक्षावर बोचरी टिप्पणी केली आहे.

10 साल खेल गई मेरे साथ..; आकांक्षावर गौरव खन्नाची बोचरी टिप्पणी, फराह खानसुद्धा चकीत!
गौरव खन्ना, आकांक्षा चमोलाImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 11, 2026 | 8:54 AM
Share

अभिनेत्री आकांक्षा चमोलाने तिच्या घटस्फोटाबद्दल मोठा खुलासा केल्यानंतर काही दिवसांतच तिचा पती आणि प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्ना आता ‘लॉक अप 2’ या शोमध्ये पोहोचला आहे. या शोमध्ये गौरव पोहोचताच आकांक्षा भावूक झाली. घटस्फोटाबद्दल शोच्या बाहेर काय आणि किती चर्चा होत आहे, याविषयी आकांक्षाला सांगतानाच गौरवने 10 वर्षांच्या नात्याबद्दल केलेल्या एका बोचऱ्या टिप्पणीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “गेल्या वर्षभरापासून आम्ही वेगळे राहत असून लवकरच घटस्फोट घेणार आहोत,” असा खुलासा आकांक्षाने या शोमध्ये केला होता. इतकंच नव्हे तर, आमच्यात विवाहित जोडप्यांसारखी भावनाच राहिली नाही, असंही तिने म्हटलं होतं.

‘लॉक अप 2’मध्ये एण्ट्री होताच गौरव आकांक्षाला म्हणाला, “बाहेर सध्या ही सर्वांत मोठी बातमी बनली आहे. आपण मे महिन्यात घटस्फोटाबद्दल चर्चा केली होती, पण लोकांना वाटतंय की आपला घटस्फोट होऊन एक वर्ष झालं आहे. ते म्हणत आहेत की तू बिग बॉससाठी ऑडिशन दिलं आणि मी सहानुभूतीसाठी ते केलं. पण कायदेशीररित्या तू अजूनही माझी पत्नी आहेस.” यावेळी सूत्रसंचालक फराह खाननेही दोघांशी संवाद साधला. आकांक्षाला अश्रू अनावर झाल्यावर गौरवने तिला शांत राहण्यास आणि खेळावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं.

पहा व्हिडीओ-

आकांक्षाने जेव्हा जिंकण्याबद्दल विचारलं, तेव्हा फराहने तिला मधेच थांबवलं. त्यानंतर गौरवने टोमणा मारला, “तुला काय वाटतं, मला हे माहीत नाही? जी 10 वर्षांपासून माझ्यासोबत खेळतेय, ती कोणताही शो जिंकू शकते.” गौरवच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांनी 24 नोव्हेंबर 2016 रोजी कानपूरमध्ये लग्न केलं. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील ही सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. मात्र आकांक्षाने पब्लिसिटी स्टंट म्हणून शोमध्ये घटस्फोटाबद्दल बोलल्याची टीकाही काही नेटकरी करत आहेत. ‘लॉक अप 2’मध्ये टिकून राहण्यासाठी तिला एक गुपित उघड करायचं होतं, त्यामुळे लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी तिने असं सगळं सांगितलं, असा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. यावेळी काहींनी अभिनेत्री रुबिना दिलैकचंही उदाहरण दिलं. बिग बॉसच्या घरात रुबिनानेही असाच खुलासा केला होता आणि नंतर ती शो जिंकली होती. इतकंच नव्हे तर तिने या शोमध्ये बायसेक्शुअल असल्याचीही कबुली दिली होती.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा